Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शिवसेनेत मोठा कलह, आदित्य ठाकरेंनी राऊतांची कॉलर धरली? महिला नेत्याचा खळबळजनक दावा

शिवसेनेत मोठा कलह, आदित्य ठाकरेंनी राऊतांची कॉलर धरली? महिला नेत्याचा खळबळजनक दावा



मुंबई: महाविकास आघाडीत राज्यसभेच्या जागावाटपावरून सुरू झालेला वाद आता शिवसेना (ठाकरे गट)च्या  अंतर्गत संघर्षात परिवर्तित झाल्याचे चित्र समोर येत आहे.



पक्षातील युवा नेतृत्व आणि ज्येष्ठ नेते यांच्यातील मतभेद उघडपणे (आदित्य ठाकरे )पुढे येत असून, यामुळे आगामी राजकीय (संजय राऊत) समीकरणांवर परिणाम होण्याची चिन्हे दिसत आहेत. या वादाच्या केंद्रस्थानी आहेत आमदार आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत. मार्च महिन्यात महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीकडे खात्रीशीर केवळ 1 जागा होती. या जागेसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्यात तीव्र स्पर्धा होती.
सूत्रांच्या माहितीनुसार, या जागेसाठी शिवसेनेची भूमिका वेगळी असताना संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. परिणामी, शरद पवार यांची बिनविरोध निवड झाली. मात्र, शिवसेनेतून प्रियांका चतुर्वेदी यांना पुन्हा राज्यसभेत पाठवण्याबाबत आदित्य ठाकरे आग्रही होते. ही संधी गमावल्यामुळे त्यांच्यात नाराजी निर्माण झाल्याचे सांगितले जाते.

याच पार्श्वभूमीवर झालेल्या एका बैठकीत आदित्य ठाकरे यांनी नाराजी व्यक्त करत "2028 ला संजय राऊत खासदार होणार नाहीत" असे वक्तव्य केल्याची चर्चा आहे. या विधानामुळे पक्षात दोन गट पडल्याच्या चर्चा अधिक जोर धरत आहेत. दरम्यान, दिल्लीत झालेल्या एका बैठकीत काही खासदारांनी आदित्य ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केल्याचीही माहिती आहे. यानंतर 'मातोश्री'वर झालेल्या बैठकीत आदित्य ठाकरे यांनी खासदारांशी संवाद टाळल्याची चर्चा असून, त्यामुळे पक्षातील अंतर्गत तणाव आणखी वाढल्याचे चित्र आहे.
एकूणच, हा वाद केवळ एका राज्यसभा जागेपुरता मर्यादित नसून, पक्षातील नेतृत्वशैली, निर्णयप्रक्रिया आणि भविष्यातील सत्ताकारण याभोवती फिरत आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा अंतर्गत संघर्ष शिवसेनेसमोर मोठे आव्हान ठरू शकतो.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.