Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Big Breaking! खासदारकी मिळवण्यासाठी महिला नेत्याने खरातकडून केला पूजाविधी, आता अंगलट येणार टोटका?

Big Breaking! खासदारकी मिळवण्यासाठी महिला नेत्याने खरातकडून केला पूजाविधी, आता अंगलट येणार टोटका?


नाशिक: भोंदूबाबा अशोक खरातच्या अनेक लीला दररोज समोर येत आहेत. आता अशोक खरात पोलीस कोठडीतच जप करत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्याची मानसिक स्थिती तर बिघडली नाही ना, याची चाचणी घेतली जाईल.
त्याचबरोबर त्याने म्हटले की, मी महिलांसोबत जबरदस्ती केली नाही, जे केलं ते विधीचाच भाग होता. मला माझ्या अंर्तमनाने धोका दिला. मी ज्यांचे भलं केलं तेच माझ्यावर उलटले. दरम्यान एसआयटी चौकशीत आणखी एक धक्कादायक बाब समोर आली असून राज्यातील एक महिला नेत्या खरातच्या संपर्कात होती व विजयासाठी पूजाविधी केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ती महिला नेत्या कोण याची चर्चा सुरू झाली आहे.

यापूर्वी अनेक नेत्यांचे फोटो समोर -

अशोक खरातसोबत अनेक राजकीय नेत्यांचे फोटो समोर आल्याने राज्यात खळबळ माजली आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी तर जयंत पाटील यांच्यावर आरोप करताना जयंत पाटील आपल्या मुलासोबत खरातच्या मंदिरात गेले होते व तेथे खरातने त्यांना रक्ताने अंघोळ घातल्याचा दावा केला गेला. त्याचबरोबर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस तसेच चंद्रकांत पाटील यांचे खरातसोबतच फोटोही समोर आल्याने खळबळ माजली असतानाच आता राज्यातील एका महिला नेत्याने खरातच्या सांगण्यावरून इशान्येश्वर मंदिरात पूजाविधी केल्याचे समोर आले आहे.

पूजा घातल्यानंतर महिला निवडणुकीत विजयी -
एसआयटी चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार एक महिला नेत्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळावा म्हणून अशोक खरातकडे गेली होती, व तिने खरातने सांगितल्याप्रमाणे पूजाही केली होती. विशेष म्हणजे त्या निवडणुकीत या महिला नेत्याचा विजयीही झाल्याचे सांगितले जात आहे. तसेच याआधीच्या अनेक निवडणुकीतही या महिला नेत्याने भोंदूबाबा अशोक खरातमार्फत पूजा केल्याचे सांगितले जाते. त्यामुळे रुपाली चाकणकर यांच्यानंतर आणखी एका महिला नेत्यावर गंडांतर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या नेत्याची विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
दुसरी महिला नेता अडचणीत -

यापूर्वी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचे अशोक खरातसोबतचे जवळचे संबंध उघड झाल्यानंतर त्यांना राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद गमवावे लागले होते. आता तर त्यांचे राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात असल्याचे म्हटले जात आहे. त्यांच्यानंतर आता आणखी एका महिला नेत्याचे पाय खोलात जात आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.