आई-वडिलांच्या शेजारी झोपलेल्या सहा वर्षीय मुलीचं अपहरण; मध्यरात्री बलात्कार करुन एकटं सोडलं
छत्तीसगडमध्ये एक धक्कादायक आणि तितकीच क्रूर घटना उघडकीस आली आहे. सहा वर्षीय मुलीचे घरातून अपहरण करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे. अत्याचार करुन मध्यरात्री तिला शेतात सोडून संशयित पसार झाले. कांकेर जिल्ह्यात ०६ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे जिल्ह्यात संतापाची लाट पसरली आहे.
आई-वडिलांजवळ झोपली असताना अपहरण
समोर आलेल्या माहितीनुसार, सहा वर्षीय पीडित मुलगी आई – वडिलांसोबत घरात झोपली होती. रात्रीच्या सुमारास दोन अज्ञातांनी चोरीच्या उद्देशाने घरात प्रवेश केला. मुलीचे अपहरण करुन संशयित पसार झाले. संशयितांनी मुलीवर मध्यरात्री लैंगिक अत्याचार करुन शेतात एकटीला सोडून फरार झाले.
दोघांना अटक
पोलिसांनी याप्रकरणी अमित जैन (२०) आणि रोशन जैन (१९) या दोघांना अटक केली आहे. दोघांनी पीडित मुलीला घरातून अपहरण करुन गावातील तळ्याच्या दिशेन घेऊन गेले. याचठिकाणी तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचा आरोप आहे.
पालकांना बसला धक्का
मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास मुलगी घरात नसल्याची माहिती पालकांना समजताच त्यांनी शोधाशोध सुरु केली. कुटुंबियांनी घर आणि घराच्या जवळील परिसरात शोध घेतला. मुलीचा पत्ता न लागल्याने गावच्या कोतवालास घडल्याप्रकराची माहिती देण्यात आली.
कोतवालाने पोलिसांना प्रसंगाचे कथन केले. यानंतर पोलिस, गावकऱ्यांनी रात्रीच्या अंधारात मुलीचा शोध घेतला. दरम्यान, तळ्याशेजारी मुलगी अत्यवस्थ स्थितीत आढळून आली. यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी उपचार सुरु केल्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे सांगण्यात आले.
पोलिसांकडून तपास
पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु करुन सुरुवातीला चार जणांना ताब्यात घेतले. चौकशीनंतर अमित जैन आणि रोहन जैन यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी दोघांनाही अटक केली असून, त्यांच्याविरुद्ध विविध कलमाअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे. पण, या घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरुन गेला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.

.jpeg)
