भारताच्या विश्वचषक विजयाला सांगलीत गालबोट, नाचण्यासाठी फायरब्रिगेडची गाडी अडवून सायरन वाजवायला लावला, पोलिसांनी काठ्या हातात घेताच...
टीम इंडियाने न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव करत 2026 चा टी-20 विश्वचषकावर भारतीय संघाचं (Team India Champions T20 World Cup 2026) नाव कोरलंय. या दमदार विजयासह भारताने तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक जिंकण्याचा (India Win T20 World Cup 2026) मान मिळवलाय. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात (IND Vs NZ Final) टीम इंडियाने न्यूझीलंडला नमवत केवळ ट्रॉफी जिंकली नाही, तर टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात अनेक नवे विक्रमही रचले आहेत. दरम्यान भारतीय संघाच्या विजयानंतर सांगलीत एक अतिशय धक्कादायक प्रकार घडला आहे. भारताच्या विश्वचषक विजयाला सांगलीत गालबोट लागल्याची घटना घडलीय.
टीम इंडियाच्या विजयानंतर जल्लोषाच्या नावाखाली तरुणांनी रस्त्यावर उतरत हुल्लडबाजी केलीय. सांगलीच्या मारुती चौकात तरूणांनी अक्षरशः धिंगाणा घातलाय. यावेळी हातात फटाके घेऊन फोडताना दुकानाच्या बोर्डाला आग लागल्याची घटना घडलीय. तर हि आग विझवण्यासाठी आलेल्या अग्निशमन दलाची गाडी अडवून बळजबरीने सायरन वाजवण्यासाठी दमबाजी केल्याचाही प्रकार घडला आहे. या गोंधळात अखेर परिस्थिती पाहून पोलिसांनी जमावाला पांगवले आणि परिसरात शांतता प्रस्थापित केलीय.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.

.jpeg)
