इराण-इस्रायल युद्धाचा भारताला मोठा झटका; कच्च्या तेलाचा भाव 107 डॉलरवर! तुमच्या शहरातील पेट्रोल महागणार?
इराण-इस्रायल युद्ध पेटलं असून जगभरात या युद्धाच्या झळा पोहोचल्या आहेत. या युद्धामुळे जगभरातील मार्केट कोसळलं आहे. सोन्या चांदीचे दर अस्थिर झाले आहेत. तर आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झालं आहे. या युद्धाच्या झळा आता तुमच्या घरापर्यंत पोहोचल्या आहेत. CNG, PNG आणि इंधनचा मोठा तुटवडा आणि मर्यादीत साठा असल्याने पेट्रोल डिझेलवरही त्याचा परिणाम होत आहे. अनेक ठिकाणी कर्मशियल सिलिंडर देणं बंद केलं आहे.
मध्यपूर्वेतील युद्धाचा भडका आता जागतिक अर्थव्यवस्थेपर्यंत पोहोचला असून कच्च्या तेलाच्या किमतींनी गेल्या साडेतीन वर्षांतील उच्चांक गाठला आहे. पण, या महासंकटातही भारतीय सर्वसामान्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे.
सोमवारी जागतिक बाजारपेठ उघडताच कच्च्या तेलाच्या किमतीत १७ टक्क्यांची प्रचंड मोठी उसळी पाहायला मिळाली. कच्च्या तेलाचे भाव प्रति बॅरल १०७ डॉलरच्या पार गेले असून गेल्या साडेतीन वर्षांतील हा सर्वात मोठा आकडा आहे. इराणने स्ट्रेट ऑफ होर्मुज हा महत्त्वाचा सागरी मार्ग बंद करण्याची धमकी दिल्याने आणि अमेरिका-इस्रायलने इराणच्या तेल डेपोंवर हल्ले केल्यामुळे जागतिक पुरवठा साखळी पूर्णपणे विस्कळीत झाली आहे.
इराक आणि कुवैतसारख्या देशांनीही आपला उपसा कमी केल्यामुळे कच्च्या तेलाचा तुटवडा निर्माण झाला असून, यामुळे अमेरिका आणि युरोपमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढण्यास सुरुवात झाली आहे. खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही दरवाढ तात्पुरती असल्याचा दावा केला असला, तरी प्रत्यक्षात अमेरिकेत पेट्रोलच्या किमती ४७ सेंट्सनी वाढल्या आहेत.
जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाने शंभरी ओलांडली असली, तरी भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कोणतीही वाढ केली जाणार नसल्याचे सरकारी सूत्रांनी स्पष्ट केले आहे. भारत सध्या आपल्या ऊर्जा स्त्रोतांमध्ये मोठी विविधता आणत असून, देशाकडे तेल आणि एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.

.jpeg)
.jpeg)