Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय! ऑनलाइन पेमेंटच्या नियमात केले बदल; तुमच्यावर काय होणार परिणाम? वाचा

रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय! ऑनलाइन पेमेंटच्या नियमात केले बदल; तुमच्यावर काय होणार परिणाम? वाचा



देशातील कोट्यवधील लोक ऑनलाइन पेमेंटचा वापर करतात. भाजी घेण्यापासून ते लोन सर्व गोष्टींसाठी ऑनलाइन पेमेंट करतात. दरम्यान, आता ऑनलाइन पेमेंट सिस्टीममध्ये बदल होणार आहे. १ एप्रिल २०२६ पासून नवीन बदल लागू होणार आहे. रिझर्व्ह बँकेने आता ऑनलाइन ट्रान्झॅक्शनसाठी टू फॅक्टर ऑथेंटिकेशन अनिवार्य केले आहे. पेमेंट करण्याआधी तुम्हाला वेरिफाय करावे लागणार आहे.

रिझर्व्ह बँकेच्या नवीन नियमानुसार, पेमेंट करताना पासवर्ड, पिन, ओटीपी, फिंगरप्रिंट किंवा फेस आयडीचा वापर करावा लागणार आहे. तुम्ही या पद्धतीने वेरिफाय करु शकतात. त्यानंतर तुम्हाला पेमेंट करता येणार आहे. यामुळे तुमच्यासोबत स्कॅम होणार नाही.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मागच्या काही वर्षात डिजिटल पेमेंट वाढताना दिसत आहे. यामध्ये अनेकदा ऑनलाइन फ्रॉड,स्कॅम होताना दिसत आहे. याआधी ओटीपीद्वारे सुरक्षित पेमेंट व्हायचे. मात्र, आता त्यामध्ये स्कॅम होताना दिसत आहे. हॅकर्स ओटीपीचा वापर करु शकतात. त्यामुळे हा निर्णय घेतला आहे.

नवीन नियमानुसार, जर तुम्ही ट्रान्झॅक्शन करताना नियमांचे पालन न करता पेमेंट केले आणि फ्रॉड झाला तर त्याची जबाबदारी कंपनी किंवा बँकेला घ्यावी लागेल. जेणेकरुन ग्राहकाला कोणतेही नुकसान होणार नाही. यामुळे बँका आणि कंपन्यांवर दबाव निर्माण होईल की कंपनीचे पेमेंट सुरक्षित असावे.

रिझर्व्ह बँकेने रिस्क बेस्ड ऑथेंटिकेशन लागू केले आहे. म्हणजे प्रत्येक ट्रान्झॅक्शननुसार सुरक्षेचा स्तर निश्चित केला जाईल. जर लहान अमाउंट असेल तर कमी पडताळणी होईल. मोठ्या रक्कमेसाठी तुम्हाला ऑथेंटिकेशन करावे लागणार आहे. याचसोबत आंतरराष्ट्रीय पेमेंटवरही हे नियम लागू होणार आहेत. १ ऑक्टोबर २०२६ पासून हे नियम लागू होणार आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.