Airtel, Jio, Vi युझर्ससाठी सरकारची आनंदवार्ता, टेलिकॉम कंपन्यांचा तो खेळ संपला, आता वर्षातून 13 वेळा रिचार्ज करण्याची झंझट नाहीच, अपडेट काय?
भारतातील टेलिकॉम कंपन्या 28 दिवस व्हॅलिडिटी प्लॅन देते. त्यांना मासिक प्लॅन म्हटले जाते. पण महिन्याचे 30 दिवस हे प्लॅन नसतात. तर केवळ 28 दिवसांचा हा प्लॅन असतो. याप्रकरणी आपचे खासदार राघव चढ्ढा यांनी संसदेत आवाज उठवला.
कंपन्यांच्या या खेळीमुळे युझर्सला वर्षभरात 12 ऐवजी 13 वेळा रिचार्ज करावे लागत आहेत. ग्राहकांच्या खिशावर नाहक एका रिचार्जचा बोजा पडल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांनी याप्रकरणी सरकारने तातडीने हस्तक्षेप करण्याची विनंती केली. त्यानंतर सरकारने उत्तर देताना सरकारी कंपन्यांचे कान टोचले. काय म्हणाले मंत्री ज्योतिरादित्य (शिंदे)सिंदिया?
सरकारचा मोठा हस्तक्षेप
राघव चड्डा यांच्या प्रश्नाला मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी उत्तर दिले. त्यांनी सरकारी टेलिकॉम कंपन्यांना 30 दिवसांचे प्लॅन बाजारात उतरवण्यास सांगितले आहे. त्यांनी Telecom Regulatory Authority of India (TRAI) ने अगोदरच टेलिकॉम कंपन्यांना निर्देश दिल्याचे सांगितले. त्यामुळे प्रत्येक टेलिकॉम कंपनी आता युझर्ससाठी कमीत कमी 30 दिवसांच्या प्लॅनचा पर्याय समोर आणण्याची शक्यता आहे.
TRAI चा नियम सांगतो काय?
TRAI ने 2022 मध्ये एक टॅरिफ नियम आणला. त्यानुसार, टेलिकॉम ऑपरेटर आपल्या प्रत्येक श्रेणीत प्रीपेड प्लॅनमध्ये कमीत एक 30 दिवसांचा प्लॅन देईल. याचा उद्देश युझर्सला 28 दिवसांच्या प्लॅनशिवाय एक मासिक चांगला पर्याय देण्याचा होता. त्यामुळे ग्राहकांना वारंवार रिचार्ज करण्याची गरज पडणार नाही यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता.
युझर्सला का करावे लागते 13 वेळा रिचार्ज
28 दिवसांचा प्लॅन प्रत्येक महिन्यातील 2-3 दिवस कमी सेवा देतो. त्यामुळे संपूर्ण वर्षभरात 365 दिवसांचे चक्र पूर्ण करण्यासाठी ग्राहकांना 13 वेळा रिचार्ज करावे लागते. ही पद्धत कंपन्यांसाठी फायदेशीर असते. पण युझर्ससाठी ही पद्धत अत्यंत महाग ठरते.
डेटा संपल्यावर मात्र मोठे नुकसान
राघव चढ्ढा यांनी कंपनीच्या 28 दिवसांच्या खेळाची पोलखोल केली. या कंपन्या 28 दिवसांचा प्लॅन देतात. उदाहरणार्थ जर आपल्याला रोज 2GB डेटा मिळत असेल आणि त्यातील तुम्ही 1.5GB डेटाच वापरला असेल तर प्लॅन संपल्यावर उरलेला 0.5GB डेटा संपतो आणि ग्राहकांना मोठे नुकसान सहन करावे लागते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.