Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीत भीषण अपघात, कार थेट ट्रॅक्टर ट्रॉलीखाली घुसली; वकील महिलेसह पतीचाही जागीच मृत्यू, घटनेनं हळहळ

सांगलीत भीषण अपघात, कार थेट ट्रॅक्टर ट्रॉलीखाली घुसली; वकील महिलेसह पतीचाही जागीच मृत्यू, घटनेनं हळहळ


सांगली: सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यात असलेल्या शिरढोण गावाच्या हद्दीत भीषण अपघात झाला आहे. रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या या अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून ही घटना आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेले दाम्पत्य मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील असून 38 वर्षीय वंदना संतोष गायकवाड आणि 45 वर्षीय संतोष धोंडीराम गायकवाड (, रा. कसबा बावडा, कोल्हापूर) अशी पती-पत्नीची नावे आहेत. वंदना गायकवाड या कोल्हापूर जिल्हा न्यायालयात वकील म्हणून काम करत होत्या.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, संतोष गायकवाड आणि त्यांची पत्नी वंदना गायकवाड हे त्यांच्या कारने कोल्हापूरहून पंढरपूरच्या दिशेने जात होते. मात्र कवठेमहांकाळ तालुक्यातील शिरढोण गावाजवळ असलेल्या एका पेट्रोल पंपासमोर पोहोचल्यानंतर विपरीत घडना घडली. गायकवाड यांच्या कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रॅक्टर आणि त्याच्या दोन ट्रॉलींना पाठीमागून जोरदार धडक दिली. अपघातग्रस्त ट्रॅक्टरचा चालक आणि कामगार चहा पिण्यासाठी जवळच असलेल्या एका हॉटेलमध्ये थांबले होते. कार आणि ट्रॅक्टरची धडक अत्यंत भीषण असल्यामुळे कार ट्रॉलीखाली अडकली. या अपघातात कारमधील गायकवाड पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर महामार्ग पोलीस आणि कवठेमहांकाळ पोलीस स्टेशनचे पथक तातडीने अपघातस्थळी पोहचले. पोलिसांनी तिथे मदतकार्य करत अपघातग्रस्त कार आणि ट्रॅक्टर रस्त्याच्या बाजूला हटवून रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली. यावेळी पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे. तसंच गायकडवा दाम्पत्याचे मृतदेह शवविच्छेदनासाठी कवठेमहांकाळ उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.