Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राज्यातील आजचा दिवसही अशोक खरात प्रकरणामुळे वादळी ठरला. या प्रकरणी आज विधानसभेत जोरदार चर्चा झाली असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन सादर केलं.

राज्यातील आजचा दिवसही अशोक खरात प्रकरणामुळे वादळी ठरला. या प्रकरणी आज विधानसभेत जोरदार चर्चा झाली असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन सादर केलं.


राज्यातील आजचा दिवसही अशोक खरात प्रकरणामुळे वादळी ठरला. या प्रकरणी आज विधानसभेत जोरदार चर्चा झाली असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन सादर केलं. तर, दुसरीकडे अशोक खरातप्रकरणामुळे राजकारण्यांवर अघोरी विधी केल्याचाही आरोप केला जातोय. सुनील तटकरे आणि रुपाली चाकणकर यांच्या बोटाला झालेल्या जखमेवरून राजकारण सुरू असतान या दोघांनीही स्पष्टीकरण दिलंय. दरम्यान, योगायोग म्हणजे दोघांच्याही बोटाला गाडीचा दरवाजा लागल्याने जखम झाली आहे. यासह राज्यात आज कोण काय काय म्हणालं हे पाहुयात.

गाडीच्या दरवाजाला लागल्याने बोटाला जखम
'कुणी काय बोलते हे मला माहीत नाही. पण माझ्या बोटाला लोकसभा निवडणुकीआधी जखम झाली होती. अर्ज भरण्याच्या दोन दिवस आधी अलिबागला एके ठिकाणी भेट दिली असता तिथे जिल्ह्याचे नामांकित वकील प्रवीण ठाकूर यांची भेट झाली. प्रवीण ठाकूर यांनी गाडीचा दरवाजा बंद करत असताना माझ्या अंगठ्याला जखम झाली होती. जखम झाल्यानंतर तिथेच जवळच्या रुग्णालयात माझ्या अंगठ्याला पाच टाके घालण्यात आले होते. दिल्लीत आल्यानंतरही माझ्या बोटाला जखम दिसत होती. यावर आता कुणी काय बोलत असेल तर दुर्दैव आहे", असं स्पष्टीकरण सुनील तटकरे यांनी दिलं.

चाकणकर आणि तटकरेंच्या बोटाला गाडीच्या दरवाजाला अडकल्याने जखम, काय तो योगायोग 'रुपाली चाकणकरांना तब्बल चार दिवसांनंतर नेमकं त्यांच्या अनामिकेला काय झालं होतं, याचं कारण सुचलं आहे. म्हणे त्यांच्या अनामिकेला गाडीच्या दरवाजाला अडकून जखम झाली. साधारण गाडीच्या दरवाजाला अंगठा, तर्जनी किंवा करंगळी अडकू शकते. पण काय योगायोग, चाकणकरांच्या अनामिकेला दरवाज्यामुळे जखम झाली. आता सुनील तटकरेंनीही पत्रकार परिषद घेतली. त्यांच्या तर्जनीलाही गाडीच्या दरवाजात अडकून जखम झाली. एकूण काय, हातातील गंडेगोरे काय, पूजा काय, बोटाला होणारी जखम काय. आणि ती जखम दरवाजात अडकून होतेय, सगळंच किती योगायोग. कमाल आहे, असा खोचक टोला शिवसेना (उद्धव ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी लगावला 

देवेंद्र फडणवीस नरेंद्र दाभोलकरांचा वारसा पुढे नेते आहेत
'भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकारण बाजूला ठेवून घेतलेल्या भूमिकेचे मी स्वागत करते. अशोक खरातसारख्या विकृत माणसाला देवेंद्र फडणवीस पाठीशी घालणार नाहीत. नरेंद्र दाभोलकर यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांची हत्या झाली. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दाभोलकरांचा वारसा पुढे नेत आहेत. त्यासाठी मी देवेंद्र फडणवीस यांचे जाहीर आभार मानते', असं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
मंत्रालयातही जादूचे पाणी

अधिकारी जर बैठकांना येत नसतील तर मंत्रालयातही खरात सारखे जादूचे पाणी देणारे काही अधिकारी दिसत आहेत. अंधश्रद्धेप्रमाणेच अंधबुद्धीही धोक्याची आहे. सभागृहात मंत्री मनापासून आश्वासन देतात. पण अधिकारी त्या फाईलवर निर्णय घेत नाहीत. जनतेने मंत्र्यांना सभागृहात पाठवले आहे, अधिकाऱ्यांना नाही, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

उद्धव ठाकरेंना निरोगी दीर्घायुष्य लाभो - एकनाथ शिंदे
'महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि या सदनाचे सदस्य उद्धव ठाकरे साहेब हे आज विधान परिषदेचा निरोप घेत आहेत. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो, या शुभेच्छा लाभो. पुढील राजकीय वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा', असं राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. ते आज विधान परिषदेत आज निवृत्त होणाऱ्या सदस्यांच्या निवृत्ती भाषणात बोलत होते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.