Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Breaking News! '...ते एकनाथ शिंदेंचे विमान पाडणार होते', राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा खळबळजनक दावा

Breaking News! '...ते एकनाथ शिंदेंचे विमान पाडणार होते', राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा खळबळजनक दावा

इराण एकनाथ शिंदेंचं विमान पाडणार होतं', असा खळबळजनक दावा आमदार रोहित पवार यांनी केला. व्हीएसआर कंपनीच्या विमानाने एकनाथ शिंदे दावोसला जात होते. तेव्हा त्या विमानाने इराणच्या हद्दीत प्रवेश केला होता, ज्यामुळे शिंदेंचा जीव धोक्यात आला होता, असं रोहित पवारांनी सांगितलं. रोहित पवारांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. रोहित पवार यांनी व्हीएसआर कंपनीवर अनेक गंभीर आरोप देखील केले.

आमदार रोहित पवार यांनी आज अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात चौथी पत्रकार परिषद घेत अनेक खळबळजनक दावे केले. यावेळी रोहित पवार यांनी अजित पवारांसोबत जे घडलं तसाच प्रकार एकनाथ शिंदे यांच्यासोबत होणार होता का? असा प्रश्न उपस्थित केला. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना २०२३ मध्ये दावोस दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्याचा उल्लेख करत रोहित पवारांनी मोठं विधान केले. व्हीएसआर कंपनीच्या निष्काळजीपणामुळे परदेशात शिंदेंचे विमान पाडले गेले असते, असे विधान त्यांनी केले आहे.

रोहित पवार म्हणाले की, '१६ ते २० जानेवारी २०२३ या काळामध्ये एकनाथ शिंदे आणि भूषण गगराणी व्हीएसआर कंपनीच्या विमानाने दावोसला गेले होते. या विमानामध्ये अमित शुक्ला पायलट इन कमांड होते. मुंबईतून या विमानाने उड्डाण घेतल्यानंतर इंधन भरण्यासाठी पहिल्यांदा ते बहरीन येथे थांबले होते. त्यानंतर या विमानाने बहरीन येथून उड्डाण घेतलं. हे विमान इराणच्या हवाई क्षेत्रातून जात होते. त्यावेळी ओव्हरफ्लाईट परवानगी नसल्यामुळे या विमानाला परत जाण्याचे आदेश देण्यात आले. नाही तर ईराणी लढाऊ विमानांकडून ते विमान पाडले जाईल असा इशारा देण्यात आला होता.'


तसंच, 'इराणच्या धमकीनंतर या विमानाने मार्ग बदलला. या विमानाने इराकच्या हवाई क्षेत्रातून जाण्याचा निर्णय घेण्यात आला. पण तिथे सुद्धा हवाई क्षेत्र सोडण्याचे आदेश देण्यात आले होते. इराणसोबत इराकनेही हे विमान पाडण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर इंधन कमी असल्याने ते विमान परत बहरीनला आले. राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत ही कंपनी असा प्रकार करते यावरून ती किती बेजबाबदारपणे वागत आहे हे लक्षात येते.' , असे रोहित पवार यांनी सांगितले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.