वडिलांचे अपूर्ण स्वप्न लेकीने केलं पूर्ण! सांगलीच्या आरुषा पाटील होणार सरकारी अधिकारी; वाचा सक्सेस स्टोरी
जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रम यांच्या जोरावर कोणतेही ध्येय गाठता येऊ शकते , याचे उत्तम उदाहरण सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील मूळची ऐतवडे बुद्रुक गावची कर्मवीर भाऊराव पाटील कर्मभूमीतील सुकन्या कु.आरुषा शरद पाटील यांनी दाखवून दिले आहे. सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील उचगाव येथे वास्तव्यास असलेल्या आरुषा पाटील यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत यश मिळवलं आहे. त्यांनी आपल्या कुटुंबासह गावाचे नाव उज्ज्वल केले आहे..
ऐतवडे बुद्रुकच्या आरुशा शरद पाटील हिने केंद्रिय लोकसेवा परीक्षेत (IAS) परीक्षेत जिद्दिने व चिकाटीने अभ्यास करून उतुंग यश मिळवून यशस्वी झाली आहे. भारतात 553 वा रँकक मिळवला आहे. आज गावात तिचा गावकऱ्यांनी मिळून सत्कार केला.यूपीएससी ही परीक्षा जिद्द, सातत्य आणि संयमाची असते. माझ्या यशामागे आई-वडिलांचे स्वप्न, कुटुंबाचा पाठिंबा आणि शिक्षकांचे मार्गदर्शन हे मोठे कारण आहे. अपयश आले तरी हार न मानता प्रयत्न करत राहिलो तर यश नक्की मिळते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीही मोठी स्वप्ने पाहावीत आणि त्या स्वप्नांसाठी प्रामाणिकपणे मेहनत घेतली तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. माझ्या या यशामुळे ऐतवडे बुद्रुक गावाचे नाव उज्ज्वल झाले याचा मला अभिमान आहे, असं आरुषा पाटील यांनी सांगितलं."खाकी वर्दी हे माझे अपूर्ण राहिलेले स्वप्न होते. ते माझ्या मुलीने पूर्ण केल्याचा मला प्रचंड अभिमान वाटतो. आरुषाने या यशासाठी रात्रंदिवस मेहनत घेतली. अनेक अडचणींवर मात करत तिने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हे यश संपादन केले. तिच्या या यशामुळे आमच्या कुटुंबासह गावाचाही सन्मान वाढला आहे, असं तिच्या कुटुंबियांनी सांगितलं.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
