Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मेकॅनिकने रात्रभर बाईकचे इंजिन चालू ठेवायला सांगितले, धुरामुळे एकाच कुटुंबातील चौघांचा गुदमरून मृत्यू

मेकॅनिकने रात्रभर बाईकचे इंजिन चालू ठेवायला सांगितले, धुरामुळे एकाच कुटुंबातील चौघांचा गुदमरून मृत्यू



आंध्र प्रदेशातील अन्नमय्या जिल्ह्यात हृदयद्रावक घटना समोर आली आहे. रात्रभर बाईकचे इंजिन सुरू ठेवणे एका कुटुंबाच्या जीवावर बेतले आहे. बाईकच्या धुरामुळे घरामध्ये कार्बन मोनोऑक्साइड वायू पसरल्याने एकाच कुटुंबातील चौघांचा गुदमरून मृत्यू झाला. मृतांमध्ये आजोबांसह दोन नाती आणि एका नातवाचा समावेश आहे. पोलिसांनी चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पुंगानूर शहरातील त्यागराज स्ट्रीटवर मुरली नामक व्यक्ती आपल्या कुटुंबासह राहतात. मुरली यांनी शनिवारी त्यांची बाईक दुरुस्तीसाठी मेकॅनिककडे दिली होती. इंजिन दुरुस्त केल्यानंतर मेकॅनिकने त्यांना इंजिन सेट होण्यासाठी रात्रभर बाईक सुरू ठेवण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे मुरली यांनी बाईक सुरू ठेवली आणि पत्नीसह गच्चीवर झोपायला गेले. तर मुरली यांचे 70 वर्षीय वडील, 15 वर्षाचा मुलगा आणि 8 वर्षाच्या जुळ्या मुली घरातच झोपले होते.
रात्रभर दुचाकी सुरू असल्याने धूर घरभर पसरला. त्यात घराचे दरवाजे आणि खिडक्या बंद असल्याने धूर आतच कोंडला. धुरातील कार्बनडाय ऑक्साईड वायुमुळे आजोबा आणि नातवंडांचा गुदमरून मृत्यू झाला. रविवारी सकाळी मुरली आणि त्यांची पत्नी गच्चीवरून खाली आले, तेव्हा ही धक्कादायक घटना उघडकीस आली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.