SBI च्या ३० कोटी ग्राहकांसाठी मोठी बातमी! बँकेत जाण्याची कटकट संपणार? अध्यक्षांनी सांगितला ‘YONO’चा मेगा प्लॅन...
स्टेट बँक ऑफ इंडियाचे (SBI) अध्यक्ष सी. एस. शेट्टी यांनी नुकतीच 'योनो डिजिटल बँक' उभारणीबाबत मोठी घोषणा केली आहे. ३० कोटी ग्राहकांना मोबाईल ॲपवर नेण्याचे बँकेचे उद्दिष्ट असून, यामुळे प्रत्यक्ष बँकेत जाण्याची गरज कमी होणार आहे.
पुणे : 'भारतीय बँकांना 'युपीआय'सारख्या प्रभावी पद्धतीचे महत्त्व समजले नाही. त्यामुळे बँकांनी त्यात गुंतवणूक केली नाही. आज मात्र त्याचा दुहेरी फटका बसत आहे. ऑनलाईन व्यवहारांसाठी भारतीय बँकांचे कोणतेही ॲप खासगी कंपन्यांच्या ॲपसारखे प्रभावी नाही. तसेच या खासगी कंपन्यांचे ॲप वापरण्यासाठीची मूळ यंत्रणा बँकांनाच उभारावी लागते. ऑनलाईन पेमेंटच्या पलीकडे जात 'एसबीआय'ने प्रत्यक्ष शाखांना पर्याय ठरेल अशा 'योनो डिजिटल बँक' (YONO Digital Bank) उभारण्यावर भर दिल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
शेट्टी म्हणाले, 'भविष्यात ऑनलाईन पद्धतीने किंवा मोबाईलच्या माध्यमातूनच व्यवहार होतील. त्यासाठी योनोमध्ये मोठी गुंतवणूक करण्यात येत आहे. एसबीआयच्या ३० कोटी ग्राहकांना योनो मोबाईल ॲपवर न्यायचे आहे. तंत्रज्ञानामुळे हे चित्र बदलले. एका क्लिकवर अनेक व्यवहार करता येतात. भविष्यात अशा ४० सेवांचे सुसूत्रीकरण करायचे आहे.'
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
