Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

माणुसकीला काळीमा! ९० वर्षीय 'आजी'वर ४ नराधमांकडून सामूहिक अत्याचार, तोंडात कापडाचा बोळा कोंबून केलं पाशवी कृत्य

माणुसकीला काळीमा! ९० वर्षीय 'आजी'वर ४ नराधमांकडून सामूहिक अत्याचार, तोंडात कापडाचा बोळा कोंबून केलं पाशवी कृत्य


मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी आणि काळजाचा थरकाप उडवणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. जिल्हा मुख्यालयापासून सुमारे ७० किलोमीटर अंतरावर असलेल्या गुनाई गावात चार नराधमांनी एका ९० वर्षांच्या वृद्ध महिलेवर पाशवी अत्याचार केले. या नराधमांनी केवळ अत्याचार केला नाही, तर या वृद्धेच्या गुप्तांगावर गंभीर वार करून तिला मृत्यूच्या दारात ढकलले. या घटनेने संपूर्ण परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून नराधमांच्या या कृत्यामुळे समाजातील सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, ही ९० वर्षीय वृद्ध महिला क्षेत्रातील एका झोपडीत एकटीच राहत होती. रात्रीच्या अंधारात तोंडाला कापड बांधलेले चार नराधम झोपडीत शिरले. त्यांनी वृद्धेला ओरडता येऊ नये यासाठी तिच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबला आणि त्यानंतर तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. हे नराधम इतक्यावरच थांबले नाहीत, तर या वृद्धेला जिवंत मारण्याच्या उद्देशाने जवळच असलेल्या विहिरीत फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र, पहाटेच्या सुमारास आजूबाजूला क्षेत्रातील लोक जागे झाल्याने, पकडले जाण्याच्या भीतीने हे नराधम वृद्धेला रक्ताच्या थारोळ्यात शेतातच टाकून पसार झाले.
दुर्दैवाची बाब म्हणजे, गंभीर जखमी अवस्थेत ही वृद्ध महिला तब्बल १२ तास घटनेच्या ठिकाणी पडून होती. शुक्रवारी सकाळी जेव्हा काही लोक शेतात पोहोचले, तेव्हा त्यांना ही हृदयद्रावक अवस्था पाहायला मिळाली. वृद्धेच्या अंगावर इतक्या जखमा होत्या की, ज्या साडीत ती होती ती पूर्णपणे रक्ताने माखली होती. हा भयानक प्रकार पाहून ग्रामस्थ हादरून गेले. त्यांनी तत्काळ सागर पोलीस (Police) आणि वृद्धेच्या गावात राहणाऱ्या वृद्धेच्या मुलीला या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनेची दखल घेऊन पीडितेची सुटका केली आणि तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले.

पीडित वृद्धेने जेव्हा आपल्यासोबत घडलेला हा संतापजनक प्रकार सांगितला, तेव्हा ऐकणाऱ्यांच्या अंगावर काटा आला. पीडितेच्या मुलीने सांगितले की, तिची आई शेतातून वेगळी राहते. काही दिवसांपूर्वी तिथे चोरीचा प्रयत्नही झाला होता, मात्र चोरांना काही मिळाले नव्हते. ज्या नराधमांनी हे कृत्य केले आहे, त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी आता व्यक्त केली जात आहे. सध्या पीडित महिला बोलण्याच्या स्थितीत नसल्याने महिला पोलीस अधिकाऱ्यांमार्फत तिचा सविस्तर जबाब घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.
पुनासा पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात नराधमांविरुद्ध सामूहिक अत्याचार आणि खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली असून संशयितांचा शोध घेतला जात आहे. समाजात घडलेल्या या अघोरी कृत्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून अशा नराधमांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.