Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नीलम गोऱ्हेंकडून सातारा SP तुषार दोशींच्या निलंबनाचे आदेश वादात; असीम सरोदे म्हणतात,'अधिकारच नाहीत'

नीलम गोऱ्हेंकडून सातारा SP तुषार दोशींच्या निलंबनाचे आदेश वादात; असीम सरोदे म्हणतात,'अधिकारच नाहीत'


सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपने धक्कादायक यश मिळवले आहे. फक्त एक ते तीन मतांच्या अत्यंत कमी फरकाने भाजपने सत्ता आपल्या ताब्यात घेतली. ही निवडणूक पूर्णपणे नाट्यमय आणि वादग्रस्त ठरली. राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन आणि शिवसेनेच्या दोन सदस्यांनी क्रॉस वोटिंग करून पक्षाच्या विरोधात मतदान केल्याने भाजपला मोठा फायदा झाला. तरीही मतदान प्रक्रियेदरम्यान मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला. या वेळी पालकमंत्री शंभूराज देसाई यांना धक्काबुक्की झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला.

शंभूराज देसाई  यांच्या हाताला जखम झाल्याचा मुद्दा विधानपरिषदेत जोरदारपणे मांडण्यात आला. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या प्रकरणावर त्वरित प्रतिक्रिया देत पोलिसांच्या वर्तनावर तीव्र नाराजी व्यक्त केली. ज्या पोलिसांनी सदस्यांना मतदानापासून रोखले, तसेच लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांनाही धक्काबुक्की केली, त्यांचे सरकारने तात्काळ निलंबन करावे, असे स्पष्ट आदेश दिले. परिणामी, सातारा पोलिस अधीक्षक तुषार दोषी यांच्यासह सुमारे 100 पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
यानंतर विधीतज्ञ असीम सरोदे यांनी माहिती दिली आहे. सरोदे म्हणाले, 'नीलम गोऱ्हे यांनी सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोषी आणि इतर शंभर कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात येत असल्याचे आदेश दिले आहेत. मात्र, कायद्याच्या दृष्टिकोनातून पाहायला गेले तर नीलम गोऱ्हे यांना पोलिसांना थेट निलंबित करण्याचे कोणतीही अधिकार नाहीत.'

आयपीएस अधिकारी हे सिव्हिल सर्व्हिसेसमधून येत असल्याने त्यांना निलंबित करण्याचे अधिकार फक्त राज्य आणि केंद्र सरकारला असतात. त्यामुळे नीलम गोऱ्हे यांनी व्यतीत होऊन हे आदेश दिले असले तरी त्यांना फक्त पोलिसांची चौकशी करण्याचे आदेश देण्याचे अधिकार आहेत.
त्यामुळे नीलम गोऱ्हे यांनी  अति उत्साहात येऊन जो पोलिसांच्या निलंबनाचा आदेश दिला आहे. तो त्यांनी त्यांच्या अधिकाराचा केलेला गैरवापर आहे. तो आधिकरांचा अतिरेक आहे. उपसभापती नीलम गोऱ्हे यांना याबाबत कोणताही अधिकार नसल्याचे असीम सरोदे यांनी सांगितले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.