Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

खरातच्या फार्महाऊवर काय चालायचं, कोणकोण जायचं? SITची हाती थेट यादीच? महाराष्ट्र पुन्हा हादरला

खरातच्या फार्महाऊवर काय चालायचं, कोणकोण जायचं? SITची हाती थेट यादीच? महाराष्ट्र पुन्हा हादरला


नाशिकच्या स्वयंघोषित ज्योतिषी आणि ‘कॅप्टन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरात यांच्या लैंगिक शोषण, बलात्कार आणि इतर गंभीर आरोपांच्या प्रकरणात विशेष तपास पथक (SIT) ने तपासाला वेग दिला आहे. काल (शुक्रवार) फार्महाऊस मॅनेजर, शिपाई (वॉचमन) आणि मंदिरातील पुजारी यांची तब्बल ८ तास कसून चौकशी करण्यात आली. या चौकशीतून महत्त्वाच्या माहिती आणि खुलाशांची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.

खरातच्या फार्महाऊसवरील व्यक्तींची चौकशी
SIT च्या अधिकाऱ्यांनी सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील खरातच्या फार्महाऊस आणि त्याच्याशी संबंधित ईशान्येश्वर महादेव मंदिरातील कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी बोलावले होते. फार्महाऊस मॅनेजर, सुरक्षा रक्षक (शिपाई), साफसफाई कर्मचारी आणि मंदिराचे पुजारी यांच्यावर प्रश्नांचा मारा करण्यात आला. खरात फार्महाऊस आणि मंदिरात कधी येत असे, कोणत्या दिवशी आणि वेळी तेथे येत असे, याचा तपशीलवार माहिती देण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मोठी यादी समोर?

चौकशीदरम्यान, खरातच्या फार्महाऊस आणि मंदिरात कोणते राजकीय नेते, प्रभावी व्यक्ती आणि बडे अधिकारी येत असत, याचीही माहिती SIT ला देण्यात आली. कामगार आणि पुजाऱ्यांचा खरातसोबतचा संपर्क कसा प्रस्थापित झाला, त्यांचे दैनंदिन कामकाज कसे चालत असे, यावरही सखोल चौकशी झाली. विशेषतः मंदिर स्थापनेपासून असलेल्या पुजाऱ्याने अनेक नावांचा खुलासा केल्याची माहिती आहे. पूजाविधी, तांत्रिक विधी किंवा ‘दैवी उपाय’ साठी येणाऱ्या व्यक्तींची यादी SIT च्या हाती लागली असून, त्यातून खरातच्या नेटवर्कचा मोठा भाग उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या प्रकरणात लैंगिक शोषणाचे आरोप अधिक गंभीर बनले असून, तपासाचा फोकस आता खरातच्या संपूर्ण नेटवर्क, राजकीय-प्रशासकीय संबंध आणि महिलांच्या शोषणाच्या पद्धतीवर वाढला आहे. SIT प्रमुख आयपीएस अधिकारी तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली हा तपास सुरू असून, फार्महाऊस आणि मंदिरातील CCTV DVR जप्त करण्यात आले आहेत. याशिवाय, अनेक व्हिडीओ आणि पुरावे तपासात समोर आले आहेत.
सूत्रांच्या मते, या चौकशीतून खरातच्या अघोरी साम्राज्याचा आणखी मोठा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे. अधिकाधिक महिला समोर येऊन तक्रार करत असल्याने प्रकरण अधिक विस्तारत आहे. पोलिसांनी सर्व संबंधितांना न्यायाच्या कठघर्यात आणण्यासाठी कसून प्रयत्न सुरू ठेवले आहेत. तपास अद्याप सुरू असून, लवकरच आणखी मोठे खुलासे होण्याची अपेक्षा आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.