Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Big Breaking! 'अशोक खरातला भेटलेल्या लोकांची HIV टेस्ट करा, नाहीतर सगळे मरतील', बड्या नेत्याची थेट विधानसभेत मागणी

Big Breaking! 'अशोक खरातला भेटलेल्या लोकांची HIV टेस्ट करा, नाहीतर सगळे मरतील', बड्या नेत्याची थेट विधानसभेत मागणी


"अशोक खरात या भोंदूबाबाला जे भेटलेत, त्या लोकांची HIV टेस्ट आपल्याला करुन घ्यावी लागेल. सरकारनेच ही टेस्ट करुन घेतली पाहिजे. नाहीतर संसर्गजन्य रोग होईल आणि सगळेच मरतील.", अशी मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली आहे. व्हिडीओमध्ये आलेत त्या सर्वांचे मोबाईलचे सीडीआर चेक केले पाहिजेत - वडेट्टीवार

विजय वडेट्टीवार म्हणाले, अशोक खरात या भोंदूबाबाचे 100 च्या वर कारनामे समोर आले आहेत. त्याच्या व्हिडीओ क्लीप समोर आले आहेत. देवाच्या आणि धर्माच्या नावाने फसवणारे हे भोंदू तयार होत आहेत. आपण पुरोगामी महाराष्ट्रा म्हणत असतो. मात्र, यामध्ये राजकीय क्षेत्रातील लोकं, आयएएस अधिकारी देखील आहेत. महसूल विभागाचे अधिकारी देखील आहेत. व्हिडीओ क्लीपमध्ये आलेत, व्हिडीओमध्ये आलेत त्या सर्वांचे मोबाईलचे सीडीआर चेक केले पाहिजेत. तो जल तयार करायचा. त्यामध्ये व्हाग्रा टाकायचा. त्या वेळेस ते देणारे कोण होते? ते देण्यासाठी कोणी आग्रह केला? हे मी सांगणार नाही. कारण मी सबंधितांना नोटीस दिलेली नाही. या प्रकरणामुळे महाराष्ट्राची देशात बदनामी झाली आहे. काही अधिकारी त्यांच्यावर कारवाई होऊ नये, यासाठी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बसून प्रयत्न करत होते. संपूर्ण महाराष्ट्राची या प्रकारामुळे मान शरमेने खाली गेली आहे.

महिला आयोगाच्या अध्यक्षा त्या तिथे जाऊन त्या भोंदूबाबाचे पाय धुतात - वडेट्टीवार
पुढे बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, केवळ एसआयटी नेमून हे प्रकरण संपणार नाही. खुद्द महिला आयोगाच्या अध्यक्षा त्या तिथे जाऊन त्या भोंदूबाबाचे पाय धुतात. अशा व्यक्तीचे समर्थन करतात. अनेक मंत्री तिथे जाऊन त्याच्या पाया पडतात. माणूस कर्तृत्वाने मोठा होतो. हात दाखवून ज्योतीष पाहून माणून मोठा होत नाही. पण काही लोकांना हात बघून घ्यायची सवय लागलीये. अनेक महिलांचे शोषण झाल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. असे अनेक महाराज तयार झाले आहेत. एक कीर्तनकार एकीकडे कीर्तन करतो, दुसरीकडे मुलीवर अत्याचार करतो. अध्यक्ष महोदय, यांनी महाराष्ट्राची लाज घालवली आहे. यामध्ये सामील असलेल्या लोकांचे राजीनामे घेतले पाहिजेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.