Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नरेंद्र मोदी स्टेडियमखाली तेलसाठे? T20 वर्ल्डकप फायनल थांबवण्यासाठी कोणत्या नेत्याकडे मागितली जातेय मदत?

नरेंद्र मोदी स्टेडियमखाली तेलसाठे? T20 वर्ल्डकप फायनल थांबवण्यासाठी कोणत्या नेत्याकडे मागितली जातेय मदत?

भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान आज टी-20 वर्ल्डकप 2026 चा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. हा सामना गुजरातमधील अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. भारताने 5 मार्च रोजी झालेल्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडला पराभूत करुन फायनलमध्ये प्रवेश निश्चित केला तर त्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच 4 मार्च रोजी न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला धूळ चारत फायनल गाठली. मुंबईत सामन्यानंतर फायनल अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार असल्याने भारतीय चाहत्यांनाच जास्त टेन्शन आलं आहे.

सोशल मीडियावर हे मैदान भारतासाठी अनलकी असल्याची जोरदार चर्चा आहे. याचं मूळ कारण म्हणजे 2023 मध्ये भारतीय संघाचा याच मैदानामध्ये एकदिवसीय क्रिकेटच्या वर्ल्डकप स्पर्धेतील अंतिम सामन्यात पराभव झाला होता. त्या आठवणी आजही भारतीयांच्या मनात कायम आहेत. 19 नोव्हेंबर 2023 चा तो दिवस आजही भारतीय चाहत्यांना खुपण्याचं कारण म्हणजे त्या स्पर्धेत भारत एकच सामना पराभूत झाला आणि तो अंतिम सामना होता. त्यामुळेच फायनल या मैदानात होणार कळल्यापासून भारतीय चाहत्यांच्या क्रिएटीविटीला धुमारे फुटले आहेत.


ट्रम्प यांची मदत घेण्याचा सल्ला?

अहमदाबादच्या मैदानामध्ये सामना घेण्याऐवजी देशातील इतर कोणत्याही मैदानात सामना चालला असता अशी चर्चा सोशल मीडियावर आहे. एकीकडे या मैदानावर सामना नको असे सांगणार असतानाच दुसरीकडे या मैदानावरील सामना टाळण्यासाठी काय काय करता येईल याचे मजेदार उपाय सुचवत आहेत. यापैकीच सर्वाधिक चर्चेत असलेला उपाय हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जवळचे मित्र असलेले अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मदतीनेच हा सामना टाळता येईल असं व्हायरल मिम्समध्ये सुचवण्यात आलं आहे. अमेरिका अनेकदा तेल समृद्ध देशांवरील ठिकाणांवर नजर ठेवून असते असं म्हटलं जातं. याचं ताजं उदाहरण व्हेनेझुएलामध्ये पाहायला मिळालं. तेथील राष्ट्राध्यक्षांच्या घरावर हल्ला करुन त्यांना ताब्यात घेत तेथील तेल साठ्यांवर अमेरिकेने ताबा मिळवला आहे. अमेरिकेच्या याच तेल प्रेमाचा संदर्भ देत भारतीयांनी ट्रम्प यांची मदत घेण्याचा सल्ला अनेक पोस्टमधून दिला आहे.

इथं तेलसाठे असल्याचं सांगितल्याने होणार काय?

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमखाली तेलाचे मोठे साठे आहेत असं ट्रम्प यांना सांगून टाकलं तर ते हे मैदान खोदून काढतील आणि इथं सामना होणार नाही असं भारतीय क्रिकेट चाहत्याचं म्हणणं आहे. त्यासंदर्भातील अनेक मिम्स सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. यामध्ये थेट ट्रम्प यांना 'ट्रम्प भाई' असं म्हणत 'या मैदानाखाली खूप तेल आहे खोदून टाका' असा सल्ला अनेकांनी दिला आहे.




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.