Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

तू खूप सुंदर दिसतेस! पुण्यात डिलिव्हरी बॉयचा प्रताप; पाण्याच्या बहाण्याने धरला हात अन्....

तू खूप सुंदर दिसतेस! पुण्यात डिलिव्हरी बॉयचा प्रताप; पाण्याच्या बहाण्याने धरला हात अन्....

पुणे: शिवाजीनगर परिसरात सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ऑनलाईन वस्तूंची डिलिव्हरी देण्यासाठी आलेल्या एका तरुणाने घरात एकट्या असलेल्या तरुणीकडे पिण्यासाठी पाणी मागितले आणि माणुसकीच्या नात्याने पाणी देणाऱ्या पीडितेशी अश्लील वर्तन करत विनयभंग केल्याची धक्कादायक घटना ६ मार्च रोजी घडली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी श्रीधर कांबळे नावाच्या डिलिव्हरी बॉयविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर परिसरात राहणाऱ्या एका विवाहित तरुणीने घरगुती वापराचे काही साहित्य ऑनलाईन मागवले होते. शुक्रवारी, 6 मार्च रोजी सायंकाळी 5 च्या सुमारास आरोपी श्रीधर कांबळे हे पार्सल घेऊन तिच्या घरी पोहोचला. तरुणीने दरवाजा उघडून आपले पार्सल स्वीकारले. व्यवहार पूर्ण झाल्यानंतर आरोपीने तहान लागल्याचे सांगत पिण्यासाठी पाणी मागितले. उन्हाळा असल्याने महिलेने देखील माणुसकीच्या भावनेने महिला पाणी आणण्यासाठी आत गेली.


आरोपी  पसार

तरुणीने पाणी दिले असता, आरोपीने अचानक तिचा हात धरला आणि "तू खूप सुंदर दिसतेस," असे म्हणत अश्लील शेरेबाजी केली. विशेष म्हणजे, ज्या वेळी हा प्रकार घडला, तेव्हा घरात तरुणीचे लहान बाळ आणि तिची सासू उपस्थित होते. अनपेक्षितपणे घडलेल्या या प्रकारामुळे तरुणी प्रचंड हादरून गेली. तिने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला असता आरोपी तिथून पसार झाला.

शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली

घाबरलेल्या तरुणीने तात्काळ आपल्या पतीला फोन करून सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर दोघांनीही शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी संबंधित ऑनलाईन डिलिव्हरी ॲपमधील माहिती आणि पार्सलच्या तपशिलावरून आरोपीची ओळख पटवली आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेतले असून त्यामध्ये आरोपीची येण्या-जाण्याची हालचाल स्पष्ट दिसत आहे. या घटनेमुळे ऑनलाईन सेवा वापरणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अनोळखी व्यक्तींना घरात प्रवेश देणे किंवा त्यांच्याशी संवाद साधणे किती धोक्याचे ठरू शकते, याचे हे वास्तव उदाहरण आहे.




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.