Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अजित पवार अपघात प्रकरण,कर्नाटक सरकारचा 'Zero FIR' फडणवीसांना प्रचंड खटकला; मुख्यमंत्र्यांनी 'कायदा' शिकवत झापलं

अजित पवार अपघात प्रकरण,कर्नाटक सरकारचा 'Zero FIR' फडणवीसांना प्रचंड खटकला; मुख्यमंत्र्यांनी 'कायदा' शिकवत झापलं


मुंबई :- राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणी कर्नाटक सरकारच्या बंगळुरू पोलिसांत 'झिरो एफआयआर' दाखल केला आहे. अजितदादांच्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारावर हा झिरो एफआयआर दाखल केली आहे. पण आता हीच कर्नाटक सरकारनं दाखल केलेली झिरो एफआयआर बेकायदेशीर असल्याचा दावा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना राज्यात गाजत असलेल्या अशोक खरात प्रकरणापासून ते उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघात प्रकरणावर व्यक्त करण्यात येत असलेल्या संशयावर सडेतोड भाष्य केलं. ते म्हणाले, देकर्नाटक सरकारला हा झिरो एफआयआर घेण्याचा अधिकारच नाही. हा दाखल करण्यात आलेला झिरो एफआयआर बेकायदेशीर असल्याचं फडणवीसांनी सांगितलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा झिरो एफआयआर बेकायदेशीर ठरवण्यापाठीमागचं कारणही सांगितलं. ते म्हणाले. झिरो एफआयआर संदर्भातला नियम असा आहे की,ज्यावेळेस व्हिक्टीम एफआयआर करण्याच्या परिस्थितीत नसेल तेव्हाच झिरो एफआयआर दाखल करता येतो.

फडणवीस म्हणाले, जेथे एफआयआर दाखल करायचा आहे, तिथे जर व्हिक्टीम पोहचू शकत नसेल, तर तो झिरो एफआयआर दाखल करुन घेतला जातो. आणि तो त्या संबंधित पोलिस स्टेशनला वर्ग करण्यात येतो. अशा प्रकारचं झिरो एफआयआर घेण्याचं अधिकार कर्नाटक सरकारला अजिबात नाही,असंही फडणवीसांनी स्पष्ट केलं.
हे जे काही कर्नाटकनं केलं आहे, त्यात उद्या काय होणार आहे, जर हीच पध्दत ठेवली तर, उद्या आमचे विखे साहेब मुंबईच्या पोलिस स्टेशनमध्ये कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याविरोधात झिरो एफआयआर नोंदवतील, आणि माझ्या दबावापोटी समजा नोंदला गेला. आणि तो झिरो एफआयआर म्हणून जाईल. पण याकरिता झिरो एफआयआर नाही,असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात कर्नाटक सरकारला ठणकावून सांगितलं.

परंतू, कर्नाटक सरकारनं महाराष्ट्र सरकारच्या बदनामीसाठी अजितदादा पवार यांच्या अपघातप्रकरणी झिरो एफआयआर घेतल्याचा आरोपही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यावेळी सभागृहात बोलताना केला. राजकीय दृष्टीकोन ठेवून कर्नाटक राज्याने हे कृत्य केले आहे. रोहीत पवार राहुल गांधी यांना भेटले, ⁠त्यांनी कर्नाटकमध्ये अजितदादांच्या अपघातासंदर्भात एफआयआर करायला सांगितला. ⁠मात्र, तसा झिरो एफआयआर करता येत नाही, ⁠तो चुकीचा आहे. 
महाराष्ट्राची मानहानी व्हावी म्हणून कर्नाटकने हे केलं आहे, असंही फडणवीस यांनी म्हटलं. तसेच फडणवीसांनी सभागृहातूनच अजितदादा पवार यांचा घातपात असेल तर या प्रकरणात कोणालाही सोडणार नाही, असं आश्वासनही त्यांनी दिले. ते म्हणाले, तुमच्या मनात शंका ठेवू नका. पण, ⁠जर यात कोणी असेल तर आकाश पातळ एक करु, ⁠मुडदाही खोदून काढू. तुम्ही तरुण आहात, तुमच्या भावना समजू शकतो. पण अजितदादांच्या अपघाती निधनाबद्दल माझ्यासह इतरांच्या भावनाही तेवढ्याच तीव्र आहेत, असंही फडणवीसांनी स्पष्ट केलं.

कर्नाटकातील बेंगळुरू येथे नोंदवलेल्या 'झिरो एफआयआर'मध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या तक्रारीत रोहित पवार यांनी अपघातामागे केवळ तांत्रिक बिघाड नसून मोठ्या कटकारस्थान असल्याचा संशय व्यक्त केला आहे. तसेच FIR मध्ये खून, निष्काळजीपणामुळे मृत्यू, कटकारस्थान, पुरावे नष्ट करणे आणि बनावट कागदपत्रे तयार करणे यासारख्या गंभीर कलमांचा समावेश आहे.
बेंगळुरू येथे अजित पवार यांच्या अपघातप्रकऱणी नोंदवलेल्या 'झिरो एफआयआर'मध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यानंतर कर्नाटक पोलिसांनी आता महाराष्ट्र पोलीस महासंचालकांना पत्र पाठवलं आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र पोलीस गुन्हा दाखल करून घेणार का? आणि पुढची प्रक्रिया कशी असणार याबाबत विविध प्रश्न उपस्थित केले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.