Big Breaking! मंत्री नरहरी झिरवाळ यांची तृतीय पंथीयासोबत अश्लील चित्रफित; मंत्री झिरवाळ कोणाच्या निशाण्यावर? मुख्यमंत्री यांची का घेतली भेट?
तृतीयपंथी पवन यादव हा मंत्री झिरवाळ यांच्यासोबत चित्रफितीमध्ये दिसतो आहे. यादव याच्यावर मुंबईतील कुरार पोलिस ठाण्यात खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल आहे. झिरवाळ हे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी या आदिवासी बहुल मतदार संघाचे आमदार आहेत. त्यांची प्रसारित झालेली चित्रफीत सात महिन्यापूर्वीची आहे. शासकीय निवासस्थानामध्ये तृतीयपंथी व्यक्ती मंत्री झिरवाळ यांच्यासोबत बिछान्यावर असून शेजारी खाद्य आणि मद्य आहे.
दोन महिन्यापूर्वी झिरवाळ यांच्या कार्यालयातील लिपिकाला 35 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले होते. तेव्हाच झिरवाळ यांच्या राजीनाम्याची विरोधकांनी मागणी केली होती. या चित्रफीत प्रकरणाची झिरवाळ यांना कल्पना होती. मंगळवारी झिरवाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केल्याचे सूत्रांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर पक्षांमध्ये मोठा गोंधळ सुरू आहे. मंत्री पदासाठी काही इच्छुक असून त्यामधून झिरवाळ यांना लक्ष केले जात असल्याची पक्षांमध्ये चर्चा आहे.अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाचे अध्यक्षपद सुनेत्रा पवार यांना मिळायला हवे, अशी मागणी करणारे झिरवाळ हे राष्ट्रवादीचे पहिले नेते होते. दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण करण्याचे अजित पवार यांनी ठरवले होते, असेही झिरवाळ यांनी जाहीर सांगितले आहे. ही चित्रफीत समोर आल्यानंतर झिरवाळ चर्चेत आले असून त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे यांच्यानंतर मंत्रीपद सोडावे लागणारे झिरवाळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे तिसरे मंत्री ठरतील.
काँग्रेसने केली राजीनाम्याची मागणी
मंत्री नरहरी झिरवाळ यांची चित्रफित समाज माध्यमावर प्रसारित होणे महाराष्ट्राच्या राजकारणातील नैतिक अध:पतनाचे ज्वलंत उदाहरण आहे. झिरवाळ यांचा मंत्रीपदाचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाधक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. या संदर्भात झिरवाळ यांच्या स्वीय सहायकांशी संपर्क साधला असता साहेबांना याप्रकरणी काही बोलायचे नाही, असे सांगण्यात आले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.