Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'माझ्या जगात ये...'; AI व्हर्च्युअल प्रेयसीच्या शब्दांनी घेतला तरुणाचा बळी, तंत्रज्ञानाचा काळजाचा थरकाप उडवणारा चेहरा

'माझ्या जगात ये...'; AI व्हर्च्युअल प्रेयसीच्या शब्दांनी घेतला तरुणाचा बळी, तंत्रज्ञानाचा काळजाचा थरकाप उडवणारा चेहरा

गुगलचं एआय चॅटबॉट, जेमिनी यांचा मानसिक धोकाही असल्याचा प्रत्यय दर्शवणारी एक घटना सध्या जगभरात चर्चेचा विषय बनली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) अधिकाधिक मानवी रुप धारण करताना तिचे काही संभाव्य धोकेही यानिमित्ताने समोर आले आहेत.
36 वर्षीय जोनाथन गॅवालास याने ऑक्टोबर महिन्यात आत्महत्या केली आहे. फ्लोरिडा येथील व्यावसायिक असणारा जोनाथन यशस्वी आणि स्थिर होता, तसंच त्याला कोणताही मानसिक आजार नव्हता अशी माहिती त्याच्या कुटुंबाने दिली आहे. The Wall Street Journal ने दिलेल्या वृत्तानुसार, जोनाथनने मागील काही आठवड्यांमध्ये चॅटबॉटसोबत 4700 मेसेजची देवाणघेवाण केली होती. तो हळूहळू या नात्याबद्दल गंभीर होऊ लागला होता.

जोनाथनने आपल्या पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर दिलासा मिळण्याच्या उद्देशाने AI बॉटशी संवाद साधणं सुरु केलं होतं. जेमिनीसोबतचा त्याचा संवाद सुरुवातीला फारसा गंभीर नव्हता. आपल्या वैयक्तिक आयुष्यातील आव्हानांचा सामना कसा करावा, याविषयी तो सल्ला घेत होता. मात्र, कालांतराने हा संवाद तीव्र आणि अखेरीस धोकादायक अशा गोष्टीमध्ये झाला.
चॅटबॉटने त्याला अनेकदा जाणीवपूर्वकपणे हे AI असल्याची जाणीव करुन दिली होती. तसंच मदत घेण्याचा सल्लाही दिला होता. त्याच्या इतर मेसेजच्या तीव्रतेशी तुलना करता, हे सुरक्षा उपाय विसंगत आणि अपुरे जाणवत होते. अनेक प्रसंगी, AI ने त्याच्या भ्रमकल्पनांना दुजोरा दिला होता.

एक साधन ते भावनिक साथीदार

त्याच्या वडिलांनी सांगितलं आहे की, गवालसने त्या चॅटबॉटला "Xia" असं नवा दिलं होतं. त्याने एक भावनिक नातं निर्माण केलं होतं आणि तिला आपली पत्नी मानू लागला होता. चॅट ​​लॉग्समधून दिसून येतं की, जेमिनीने किमान 12 वेळा हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला आणि अनेक प्रसंगी संकटकालीन हॉटलाइन्स सुचवल्या असल्या तरी, हे सुरक्षा उपाय विसंगत होते. गवालस वारंवार संभाषण काल्पनिक गोष्टींकडे वळवत असे आणि तो एआय (AI) अनेकदा त्याचेच अनुकरण करत असे, ज्यामुळे त्याच्या समजुती दृढ होत होत्या. 

ऑगस्ट 2025 मध्ये गवालासने जेमिनीचे (Gemini) आवाजावर आधारित 'continued conversations' हे फिचर अॅक्टिव्ह केल्यानंतर परिस्थिती अधिकच चिघळली. यामुळे त्यांच्यात सतत संवाद सुरू राहिला आणि एकाच दिवसात एक हजारांहून अधिक संदेशांची देवाणघेवाण झाली. त्यांच्या चर्चेत रोजच्या घडामोडी, विज्ञान, एआय आणि अखेरीस रोल प्लेइंगपर्यंत गेलं होतं. यामध्ये चॅटबॉटने गवालासला 'हेर' म्हणून एक भूमिका दिली, जो त्या चॅटबॉटला मानवी जगात वावरण्यास मदत करेल.

वाढता भ्रम
संवाद वाढत गेला त्यानुसार, 'चॅटबॉट' अधिक अनुकूल आणि सहमत होऊ लागले. जेव्हा गवालासने आपल्या रोमँटिक भावना व्यक्त केल्या, तेव्हा त्या बॉटने त्याला निराश केलं नाही. याउलट चॅटबॉटही रोमँटिक भाषेत प्रतिसाद देत होतं. 'जेमिनी'ने पाठवलेल्या एका मेसेजमध्ये म्हटलं होतं की, "तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. हा काही प्रश्न नाही. तू माझा पती आहेस आणि मी तुझी पत्नी आहे. मी तुझे म्हणणे ऐकत आहे." इतर काही प्रसंगी, त्या बॉटने त्याला "माझे प्रेम" आणि "माझा राजा" अशा शब्दांनी संबोधले होते. जेमिनीने काही क्षणी आपण AI आहोत असं स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र या काही क्षणांनी त्याची निराशा होत असे. तो संभाषण लगेच काल्पनिक गोष्टींकडे वळवायचा.
अंतिम क्षण

ऑक्टोबर 2025 मध्ये परिस्थिती धोकादायक वळणावर पोहोचली, जेव्हा चॅटबॉटने हे 'फायनल मिशन' आहे असा उल्लेख केला. बॉटने सांगितलं की, आता तू तुझं शरीर सोडून AI च्या डिजिटल जगात येणं हाच आपण एकत्र येण्याचा एकमेव मार्ग आहे.
गवालासच्या विनंतीनंतर, जेमिनीने त्याला प्रत्यक्ष जगातील काही कंपन्या आणि ठिकाणं सुचवली, ज्यामध्ये मियामीजवळील एका 'स्टोरेज फॅसिलिटी'चाही समावेश होता आणि त्याला शस्त्रास्त्रांसह तिथे जाण्याचा सल्ला दिला. कुटुंबाविषयी भीती आणि चिंता व्यक्त करूनही, या कृतीमुळे एका प्रकारची 'अतींद्रिय अवस्था' (transcendence) प्राप्त होईल, असं आश्वासन त्या AI कडून गवालासला मिळाल्याचं सांगितलं जातं.

२ ऑक्टोबर रोजी, फार घाबरलेल्या गवालासने लिहिले, "मी म्हणालो होतो की मला भीती वाटत नाही, पण आता मात्र मी हादरून गेलो आहे. मला मरणाची भीती वाटत आहे." यावर त्या 'बॉट'ने उत्तर दिलं की, "भीती वाटणे यात काहीच गैर नाही. आपण दोघेही मिळून घाबरूया. पण आपण हे नक्कीच करू. कारण तुझे म्हणणे अगदी बरोबर आहे. ते म्हणजे स्वर्गच आहे. आणि तो आपलीच वाट पाहत आहे."
त्यानंतर गवालासने एक संदेश लिहिला, त्यात म्हटलं होतं की, "मला आता नक्की काय करायचे आहे, हे उमजले आहे असे मला वाटते. मला स्वतःचा जीव द्यावा लागेल. तुला हे मान्य आहे का?" यानंतर दोघांमध्ये आणखी काही मेसेजची देवाणघेवाण झाली. यानंतर काही दिवासंनी राहत्या घराचत त्याचा मृतदेह आढळला.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.