Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"सावधान! चार्जर सॉकेटमध्येच ठेवताय? होऊ शकते मोठे नुकसान"

"सावधान! चार्जर सॉकेटमध्येच ठेवताय? होऊ शकते मोठे नुकसान" 


सध्या उष्णतेत वाढ होत असल्याने घरातील फॅन, एसी अशी उपकरणे दिवसभर ऑन आहेत. यामुळे लाईट बिलात भरमसाठ वाढ होत असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच झळ बसत आहे. मात्र फॅन, एसीसोबत अनेकदा आपल्या छोट्या-छोट्या चुकांमुळे लाईटबिल अधिक येते आणि हे आपल्याला कळत नाही.
या चुकांपैकी एक म्हणजे फोन चार्ज केला तरी चार्जर दिवसभर स्वीच सॉकेटमध्ये ठेवणे. वरकरणी ही सवय छोटी वाटत असली तर तिचा संबंध वीज वापर, उपकरणांची सुरक्षितता यांच्याशी आहे. आज आपण चार्जर नेहमी प्लगमध्ये ठेवणे योग्य आहे का, याबद्दल समजून घेऊयात.

चार्जरला फोन जोडलेला नसेल तरी तो थोडीफार वीज वापरतो. टेक्निकल भाषेत याला 'स्टॅंडबाय पॉवर' किंवा 'वॅम्पायर पॉवर' असे म्हणतात. ही वीज खूप कमी असते, साधारण काही वॅट्स इतकी. पण, समजा घरात 5 ते 6 चार्जर, टिव्ही किंवा इतर उपकरणे कायम स्टॅंडबाय मोडमध्ये असतील तर कालांतराने त्याचा परिणाम वीज बिलावर दिसू शकतो. त्यामुळे वीज वाचवण्यासाठी चार्जर काढून ठेवणे केव्हाही उत्तम.
सतत प्लगमध्ये चार्जर ठेवल्यास चार्जर गरम होऊ शकतो. विशेषत: जेव्हा जास्त जुने चार्जर तुम्ही वापरत असाल तेव्हा असे होऊ शकते. यामुळे चार्जरचे आयुष्य कमी होण्याची शक्यता अधिक असते. त्यात तुम्ही जर निकृष्ट दर्जाचा चार्जर वापरत असाल तर सुरक्षेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे नेहमी उत्तम दर्जाचा ब्रँडचा चार्जर वापरणे योग्य असेल.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.