नवी दिल्ली: तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाच्या (ONGC) मुंबई हाय अॅसेट सुविधेच्या एसएचपी प्लॅटफॉर्मवर शुक्रवारी संध्याकाळी आग लागली. या घटनेत दहा कामगार किरकोळ जखमी झाले. कंपनीच्या माहितीनुसार, सर्व जखमींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. ओएनजीसीने कळवले की, सायंकाळी 5:45 च्या सुमारास आग लागली. माहिती मिळताच, आपत्कालीन प्रतिसाद पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तात्काळ कारवाई करून आग पसरण्यापासून रोखली. वेळेवर परिस्थिती नियंत्रणात आणल्याने मोठे नुकसान टळले.
=
कंपनीने सांगितले की, आग नियंत्रणात आणल्यानंतर सर्व आवश्यक सुरक्षा तपासण्या पूर्ण झाल्या आहेत. प्लॅटफॉर्मवरील तेल आणि वायू उत्पादन सध्या सामान्यपणे सुरू आहे. ओएनजीसीच्या प्रवक्त्याने सांगितले की, परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात आहे.मुंबईच्या किनाऱ्यापासून सुमारे 160 किमी अंतरावर अरबी समुद्रात स्थित असलेला मुंबई हाय, हा देशातील प्रमुख तेल आणि वायू उत्पादक क्षेत्रांपैकी एक आहे. भारताच्या देशांतर्गत उत्पादनात त्याचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. आगीचे कारण सध्या अज्ञात आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी चौकशी सुरू केली जाईल, असे कंपनीने सूचित केले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.