Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

​"प्रतिष्ठेच्या लढाईत भावनिक वळण! भाषणादरम्यान जय पवारांचा आवाज चिरकला"

​"प्रतिष्ठेच्या लढाईत भावनिक वळण! भाषणादरम्यान जय पवारांचा आवाज चिरकला"


पुणे : बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानं रिक्त झालेल्या जागेवर विधानसभा पोटनिवडणूक होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मेळाव्याचं आयोजन बारामतीत करण्यात आलं होतं. या मेळाव्यात जय पवार यांनी विविध मुद्दे मांडले. जय पवार म्हणाले की, ही बारामती दादांची आहे,तुमच्यामुळे दादा होते. 28 तारखेला थोडसं रडलो मात्र हे दादांचा रक्त आहे शेवटपर्यंत थांबणार नाही, असं जय पवार म्हणाले.

तुमच्यासमोर रडू नाही तर कुणासमोर...

जय पवार बोलताना भावनिक झाले त्यावेळेस कार्यकर्ते म्हणाले दादा रडू नका त्यावर जय पवार म्हणाले मी तुमच्यासमोर रडू नाहीतर कुणासमोर रडू, दादा आपल्यात नसतील पण दादा आपल्या हृदयात आहेत. निवडणूक लढण्याचा अधिकार सगळ्यांना आहे, बारामतीकरांनी ठरवलेलं आहे.
बारामती मध्ये विकास काम दिसत आहेत ती दादांमुळे आहेत आणि साहेबांमुळे आहेत. बारामतीत सगळ्या पवार कुटुंबियांनी एकत्र मिळून काम केलं. अजितदादांनी केलेल्या कौतुकाची आठवण देखील जय पवार यांनी सांगितली. बारामतीमधील जिरायत हा शब्द दादांनी काढून टाकला. मी आज पाहणी करण्यासाठी गेलो होतो. तिथं काहीजण म्हणाले दादा असते तर रात्रीच सगळं करून टाकलं असतं. मी नवीन आहे, मी हळूहळू करेल शिकतोय मी, अनेक काम सध्या विकास काम सुरू आहेत. दादांनी नियोजन करून कामं ठेवली होती, दुर्दैवाने ते आपल्याला सोडून गेले. दादांचे स्वप्न पूर्ण करायला मला तुमच्या सगळ्यांची गरज आहे, असं जय पवार म्हणाले.
एमआयडीसी आपल्याला वाढवायची आहे. 28 जानेवारी हा आपल्यासाठी काळा दिवस होता. मला अजूनही विश्वास बसत नाही कधी कधी मला वाटतं, दादा दौऱ्यावरून परत येतील, फोन येईल. मला तुमच्या सगळ्यांमध्ये दादा दिसतायेत, असं जय पवार म्हणाले.

माझे मुद्दे रोहितदादांनी आधीच सांगितले

जय पवार पुढे म्हणाले की सीआयडीने माझं रक्त डीएनए चेक करायला घेतलं.ज्या दिवशी घटना घडली त्यादिवशी मी डीवायएसपी यांना सांगितलं होतं की काही करून मला ब्लॅक बॉक्स पाहिजेत आणि दोन्ही ब्लॅक बॉक्स मिळाले. कारवाई होऊ द्या सगळं अहवाल येऊ द्या मग आपण बोलू असं जय पवार यांनी म्हटलं. माझे जे मुद्दे होते ते रोहित दादांनी आधीच सांगितले आहेत मग मी परत बोलायचं का असा सवाल जय पवार यांनी केला.
अजितदादांचा अपघात की घातपात मला माहित नाही. ज्यांनी व्हिडिओ बघितला त्यांच्या सगळ्यांच्या मनात शंका आहे, प्लेन असं होऊ शकत नाही हे सगळ्यांना माहित आहे. मी पण एक रोहित सिंग चा व्हिडिओ टाकला त्याबाबत लिहिलं आहे. जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत त्यांना अटक करा, अशी मागणी केल्याचं जय पवार यांनी सांगितलं.
सुनेत्रा वहिनींनी मुख्यमंत्री यांना सांगितलं की सीबीआयला सांगितलं चौकशी करा. मी बोललो तर तपास यंत्रणांना धक्का पोहोचतो त्याच्यामुळे मी बोलत नाही, असं जय पवार म्हणाले. तपासणी यंत्रणेला त्यांच्या हिशोबाने कारवाई करू द्या, मला सगळं माहित आहे, असंही जय पवार यांनी म्हटलं.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.