Big Breaking ! "नाशिकच्या घटनेची पुनरावृत्ती! भोंदू बाबाचा अघोरी प्रकार; महिलेच्या गुप्तांगातून 'द्रव' काढून केलं भयंकर कृत्य"
महाराष्ट्रातील नाशिकमधील भोंदू कॅप्टन खरात प्रकरण ताजे असताना आता रायगडमध्ये एका भोंदू बाबाने एका महिलेवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. नवऱ्याच्या बाहेरील प्रेमप्रकरणाला कंटाळून उपाय मागण्यासाठी ही महिला या बाबाकडे गेली असता अनुचित प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी पिडीत महिलेने खालापुर पोलिस ठाण्यात या भोंदू बाबा विरोधात तक्रार दाखल केली आहे. देव देवतांच्या नावाखाली चालणाऱ्या या प्रकरणामुळे महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अब्दुल रशीद उर्फ बाबाजान या भोंदू बाबाचे नाव आहे. भोंदू बाबाजान हा नवीमुंबई येथील कळंबोलीमध्य रहिवाशी आहे. तर पीडित महिला सांताक्रूझ मुंबई येथील रहिवाशी आहे. तसेच सदर प्रकरण रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील महड येथील निर्जन ठिकाणी असलेल्या एका फार्म हाऊसवर घडली आहे.पिडीत महिला पतीच्या प्रेयसी बाबत उपाय करण्यासाठी भोंदूबाबाकडे गेली होती. या वेळी उपाय करण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाजानने मध्यरात्रीच्या वेळी अघोरी पुजाविधी करण्यासाठी महिलेला खालापूर तालुक्यातील महड येथील निर्जन ठिकाणी असलेल्या एका फार्म हाऊसवर बोलावलं.मध्यरात्रीच्या वेळी ही अघोरी पूजा करताना आरोपीने महिलेच्या गुप्तांगातील द्रव काढून तो दोऱ्याला लावून तो दोरा जाळला. यावेळी सदर भोंदू बाबाने महिलेच्या शरिराला स्पर्ष केला तसेच शारिरीक संबंध करीत लैंगिक अत्याचार केला असल्याचे महिलेने म्हटले आहे. याप्रकरणी खालापुर पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली. महिलेच्या तक्रारीवरून या भोंदू बबजानला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरु असून या अशा अघोरी प्रकरणांना बळी न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.