Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Big Breaking! पुण्यातील महिला सुधारगृहात सुरक्षेचा धिंडवडा; केअरटेकरला जखमी करत १३ बांगलादेशी मुली पळाली

Big Breaking! पुण्यातील महिला सुधारगृहात सुरक्षेचा धिंडवडा; केअरटेकरला जखमी करत १३ बांगलादेशी मुली पळाली


पुण्यातील हडपसर, महंमदवाडी रोडवरील 'रेस्क्यू फाउंडेशन' या संस्थेमधून 13 बांगलादेशी मुलींनी केअरटेकर आणि सुरक्षारक्षकावर हल्ला करून पलायन केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे महिला संरक्षण गृहांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

सिनेस्टाईल पलायनाचा थरार

सदर घचनेच्या उपलब्ध माहितीनुसार एका बांगलादेशी मुलीने औषध घेण्याच्या बहाण्यानं संस्थेच्या केअरटेकर लक्ष्मी कांबळे यांना दरवाजा उघडण्यास सांगितलं. त्यांनी दरवाजा उघडताच इतर चार मुलींनी कांबळे यांच्यावर हल्ला केला. त्यांना वैद्यकीय कक्षात कोंडून ठेवलं. त्याच वेळी संस्थेच्या आवारात साफसफाई सुरू असताना सुरक्षारक्षकाकडून मुख्य दरवाजा चुकून उघडा राहिला, याचा फायदा घेत 13 बांगलादेशी मुलींनी सुरक्षारक्षकाला ओढत आणि त्याचा चावा घेत तिथून पळ काढला. 

घटनेची माहिती मिळताच संस्थेने तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी सय्यदनगर आणि हडपसर परिसरात शोधमोहीम राबवून पळालेल्या मुलींपैकी दोघींना ताब्यात घेतलं. पण, इतर 11 मुली अद्यापही बेपत्ता आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या घटनेबाबत हडपसर पोलिसांनी अद्याप एफआयआर नोंदवलेला नसून केवळ 'जी.डी.' नोंद केली आहे.

रेस्क्यू फाउंडेशनमध्ये काय करत होत्या या मुली?
रेस्क्यू फाउंडेशन ही संस्था मानवी तस्करीतून वाचवलेल्या महिला आणि मुलींसाठी काम करते. संस्थेच्या माहितीनुसार, 16 मार्च 2024 पासून संस्थेला दिलेले पोलीस संरक्षण काढून घेण्यात आले होते. याबाबत जिल्हा दंडाधिकारी आणि पोलीस आयुक्तांकडे वारंवार पाठपुरावा करूनही संरक्षण पुन्हा देण्यात आलं नव्हतं.

सध्या संस्थेमध्ये क्षमतेपेक्षा जास्त महिला वास्तव्यास आहेत. पलायन केलेल्या मुली या बांगलादेशी नागरिक असून त्यांच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया अत्यंत संथ गतीने चालते. या प्रक्रियेला साधारण 1 ते 2 वर्षे लागतात, ज्यामुळे मुलींमध्ये नैराश्य येते आणि अशा प्रकारचे टोकाचे पाऊल उचलले जात असल्याचे संस्थेचे म्हणणे आहे. सध्या संस्था सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांच्या मदतीने बेपत्ता मुलींचा शोध घेत आहे. काळेपडळ पोलिसांकडून 11 मुलींचा शोध सुरू आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.