Big Breaking! 'कवील सर्किट नेटवर्क'ला DGGI चा दणका! कोल्हापुरातून चालणाऱ्या १२१ कोटींच्या आंतरराज्यीय रॅकेटचे कंबरडे मोडले.
कोल्हापूर :- CGST कायदा, 2017 अंतर्गत मोठी कारवाई समोर आली असून कोल्हापूर येथील कवील सर्किट सेवा संस्थांविरुद्ध तब्बल 121 कोटी रुपयांच्या केंद्र सरकारला फसवल्याची माहिती समोर येत आहे. ही रॅकेट केवळ 12 ते 14 कोटींचे नसून ते आंतरराज्यीय व्याप्तीचे आहे.
केंद्रीय GST गुप्तचर यंत्रणा, कोल्हापूर कडून संकलित पुराव्याच्या आधारावर कल्पकतेने आणि कसून तपासणीनंतर या फसवणुकीचे आंतरराज्यीय जाळे समोर आले आहे. या कारवाईमध्ये कोल्हापूर युनिटने कवील सर्किटच्या विविध भागातून मोठ्या प्रमाणात पुरावे जप्त केले आहेत. ही कारवाई CGST कायदा, 2017 च्या कलम 132 अंतर्गत दंडात्मक कारवाईसाठी प्रवृत्त करण्यात आली आहे.
केंद्रीय GST गुप्तचर यंत्रणा, कोल्हापूर यांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कारवाई केली असून कोल्हापूर विभागात सेवा क्षेत्रातील ही मोठी कारवाई मानली जात आहे. या कारवाईत मोठ्या प्रमाणात बनावट बिले आणि आयटीसी (ITC) मिळवल्याचे दिसून येत आहे. प्राथमिक तपासात अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
या जाळ्याचे मुख्य सूत्रधार कवील सर्किट नावाचे सेवा केंद्र चालवत होते. संशयित आरोपींमध्ये काही चार्टर्ड अकाउंटंट (CA) आणि टॅक्स प्रॅक्टिशनर्स यांचाही सहभाग असल्याची शक्यता नाकारता येत नाही. तपासानुसार, या जाळ्याने महाराष्ट्रासह इतर राज्यांतही बनावट बिलिंगचे जाळे पसरवले होते. बनावट कंपन्या आणि बनावट बिले तयार करून सरकारी तिजोरीवर दरोडा टाकण्याचे काम सुरू होते. या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी कोल्हापूर DGGI पथकाने विशेष मोहिमेअंतर्गत अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत.
या रॅकेटचा मुख्य उद्देश कर चोरी करणे आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) हडपणे हा होता. तपासात असेही आढळून आले आहे की, आरोपींनी बनावट कंपन्या स्थापन करून वस्तू आणि सेवांचा पुरवठा न करता केवळ बिले तयार केली होती. कोल्हापूर विभागात आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे मानले जात असून, या रॅकेटशी संबंधित अनेक व्यक्ती आता रडारवर आहेत. या कारवाईमुळे करचोरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.