Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Big Breaking! विठ्ठल नगरीत खळबळ: किरकोळ कारणावरून नगरसेवकाने चालवला कोयता; तिघे गंभीर जखमी

Big Breaking! विठ्ठल नगरीत खळबळ: किरकोळ कारणावरून नगरसेवकाने चालवला कोयता; तिघे गंभीर जखमी


पंढरपूर: सोलापूर जिल्ह्यातील पंढरपुरात एक धक्कादायक घटना घडली आहे. इथं एका नगरसेवकाने आपल्या काही साथीदारांच्या मदतीने तीन जणांवर कोयत्याने हल्ला केला आहे. या हल्ल्यात तिन्ही तरुण गंभीर जखमी झाले आहेत. एका विद्यमान नगरसेवकानेच अशाप्रकारे हल्ला केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. 
या प्रकरणी पंढरपूर पोलिसांनी नगरसेवकांसह तब्बल २० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे. लोकेश यादव गुन्हा दाखल झालेल्या विद्यमान नगरसेवकाचं नाव आहे. ते भालके गटाच्या 'तीर्थक्षेत्र विकास आघाडी'चे विद्यमान नगरसेवक आहेत. लोकेश यादव यांच्यासह माजी नगरसेवक नागेश यादव आणि इतर २० जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर शहरात ही घटना घडली आहे. आरोपी नगरसेवक लोकेश यादव आणि त्याचे साथीदार पीडित व्यक्तींकडे वारंवार 'भिशी' लावण्याचा तगादा लावत होते. मात्र, संबंधित तिघांनी भिशी लावण्यास नकार दिल्याने आरोपींचा राग अनावर झाला. याच रागातून लोकेश यादव आणि नागेश यादव यांनी आपल्या साथीदारांसह मिळून या तिघांवर कोयत्याने सपासप वार केले. या हल्ल्यात तिघेही गंभीर जखमी झाले असून, परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नगरसेवकासह २० जणांवर गुन्हे दाखल
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या जीवघेण्या हल्ल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पीडित व्यक्तींच्या तक्रारीवरून पंढरपूर पोलिसांनी नगरसेवक लोकेश यादव आणि माजी नगरसेवक नागेश यादव यांच्यासह एकूण २० जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न आणि इतर गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. एका लोकप्रतिनिधीकडूनच अशा प्रकारे गुन्हेगारी कृत्य घडल्यामुळे पंढरपुरात मोठी चर्चा सुरू आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, फरार असलेल्या इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.