Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

खरातचं 'लेडी कनेक्शन' उघड! बड्या महिला अधिकाऱ्याने केली मदत; SIT च्या तपासात धक्कादायक गौप्यस्फोट.

खरातचं 'लेडी कनेक्शन' उघड! बड्या महिला अधिकाऱ्याने केली मदत; SIT च्या तपासात धक्कादायक गौप्यस्फोट.


नाशिक : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. अशोक खरात याने पीडित महिलांच्या आधारकार्ड आणि पॅनकार्डचा वापर करुन पतपेढ्यांमध्ये खाते उघडले होते. पण याबाबत महिलांना माहिती नसायची. त्या खात्यांच्या माध्यमातून त्याने कोट्यवधी रुपयांचा व्यवहार केल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. तसेच अशोक खरात याच्या मुलाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं तेव्हा त्याने घरात दररोज मोठ्या प्रमाणात कॅश यायची, अशी कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे. 
तसेच पैशांच्या व्यवहार प्रकरणी आगामी काळात अशोक खरात प्रकरणात ईडी चौकशीदेखील होईल, अशी माहिती स्वत: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. या सर्व घडामोडी ताज्या असतानाच आज नवीन माहिती समोर आली आहे. नाशिकमध्ये एकेकाळी बड्या पदावर कार्यरत असलेल्या महिला पदाधिकाऱ्याने अशोक खरात याला नियमबाह्य मदत केल्याचा आणि दोघांमध्ये पैशांचा व्यवहार झाल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे ही महिला अधिकारी आता पोलिसांच्या रडारवर आली आहे. 
नाशिकमधील बहुचर्चित भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण आता एका नव्या वळणावर येऊन ठेपले आहे. या प्रकारणाचा तपास करणाऱ्या SIT पथकाच्या हाती खळबळजनक पुरावे लागले आहेत. अशोक खरातला मदत करणारी एक तत्कालीन उच्चपदस्थ महिला अधिकारी आता पोलिसांच्या रडारवर आली आहे. यामुळे प्रशासकीय वर्तुळात देखील एकच खळबळ उडाली आहे.



दोघांमध्ये आर्थिक देवाणघेवाण झाल्याचा संशय

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला अधिकारी नाशिकमध्ये कार्यरत असताना या महिला अधिकारीने अशोक खरातला अनेक प्रशासकीय कामांमध्ये नियमबाह्य मदत केली होती. या मदतीच्या बदल्यात भोंदूबाबा अशोक खरात याने आपले राजकीय लागेबांधे आणि नेटवर्क वापरून या महिला अधिकाऱ्याला हवी असलेली पोस्टिंग मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. आर्थिक व्यवहारांचे धागेदोरे केवळ बदली किंवा बदल्यात मदतच नाही, तर या दोघांमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक देवाणघेवाण झाल्याचेही तपासात समोर आल्याची माहिती आहे.

खरातच्या काळ्या साम्राज्याला या अधिकाऱ्याचे संरक्षण लाभले होते का? या दिशेने SIT आता तपास करत आहे. लवकरच या सदर महिला अधिकाऱ्याची देखील चौकशी होण्याची शक्यता आहे. तांत्रिक पुराव्यांच्या आधारे हा संशयाचा वेढा अधिक घट्ट झाला असून, लवकरच या प्रकरणात मोठे मासे गळाला लागण्याची चिन्हे आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.