Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Big News! निदा खान बेपत्ता प्रकरणी कोर्टात हायव्होल्टेज ड्रामा; सरकारी पक्षाने मांडली भक्कम बाजू

Big News! निदा खान बेपत्ता प्रकरणी कोर्टात हायव्होल्टेज ड्रामा; सरकारी पक्षाने मांडली भक्कम बाजू


नाशिक: टीसीएस कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचा लैंगिक छळ आणि धर्मांतरण प्रकरणातील संशयित आरोपी निदा एजाज खान हिने दाखल केलेल्या अंतरिम अटकपूर्व जामीन अर्जावर नाशिकन्यायालयात सुनावणी पार पडली. या अर्जावर आता २७ एप्रिल रोजी पुढील सुनावणी होणार असल्याची माहिती सरकारी वकील किरण बेंडभर यांनी दिली आहे. 
निदा खान हिच्या वतीने न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता, ज्यावर तिच्या वकिलांनी युक्तिवाद केला. मात्र, सरकारी वकील किरण बेंडभर यांनी या अर्जाला तीव्र विरोध दर्शवला. सरकारी वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, हा गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे. यामध्ये केवळ छळवणूक नाही, तर धर्मांतरणासारखे गंभीर आरोप आहेत.

अ‍ॅट्रोसिटी कायद्याचा समावेश

या प्रकरणात अ‍ॅट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत आरोपीला जामीन देण्यापूर्वी सरकारची आणि पीडितांची बाजू ऐकून घेणे अनिवार्य आहे. राज्य महिला आयोगानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, यातील तपासावर लक्ष ठेवले जात आहे, असेही न्यायालयाने सांगितले.

पुढील दिशा
सरकारी पक्षाने आपले सविस्तर म्हणणे मांडण्यासाठी न्यायालयाकडे वेळ मागितला होता. ही विनंती मान्य करत न्यायालयाने आता २७ एप्रिल ही सुनावणीसाठी पुढील तारीख निश्चित केली आहे. तोपर्यंत निदा खान हिला अटकेपासून संरक्षण मिळणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.