Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांची तडकाफडकी बदली; तुषार दोशींच्या रूपाने जिल्ह्याला नवा 'कमांडंट'​

सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांची तडकाफडकी बदली; तुषार दोशींच्या रूपाने जिल्ह्याला नवा 'कमांडंट'


सांगली :- गेल्या काही काळापासून प्रशासकीय दिरंगाई आणि अवैध धंद्यांच्या विळख्यामुळे चर्चेत राहिलेल्या सांगली जिल्ह्याच्या पोलीस दलात अखेर मोठे फेरबदल झाले आहेत. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी तुषार दोशी यांची नवीन पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे.

​घुगे यांचा कार्यकाळ: 'खाकी'ची जरब की अवैध धंद्यांचे नंदनवन?
​संदीप घुगे यांचा सांगलीतील कार्यकाळ हा गुन्हेगारांपेक्षा अधिक अवैध धंदेवाल्यांसाठी 'सुवर्णकाळ' ठरला की काय, अशी चर्चा आता दबक्या आवाजात सुरू झाली आहे. त्यांच्या कार्यकाळात जिल्ह्यात मटका, गावठी दारू आणि वाळू तस्करीने अक्षरशः उच्चांक गाठला होता.
​अवैध धंद्यांना ऊत: जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात अवैध धंदे फोफावले असताना पोलीस प्रशासन मात्र 'धृतराष्ट्रा'च्या भूमिकेत होते. घुगे यांच्या मवाळ धोरणामुळे गुन्हेगारांचे मनोबल वाढले आणि सर्वसामान्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. प्रशासकीय पकड सैल: पोलिसांची जी 'जरब' गुन्हेगारांवर असायला हवी होती, ती घुगे यांच्या काळात कुठेही दिसली नाही. बदल्यांचे राजकारण आणि अंतर्गत विसंवादामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाली.​केवळ नावापुरतेच 'अधीक्षक'?: कारवाईचा केवळ फार्स आणि प्रत्यक्षात अवैध धंद्यांचे 'आशीर्वादित' साम्राज्य, अशीच काहीशी स्थिती जिल्ह्याने अनुभवली.

​तुषार दोशींकडून 'सफाई'ची अपेक्षा
​नूतन पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यासमोर आता सांगली जिल्ह्याची विस्कळीत झालेली कायदा-सुव्यवस्था रुळावर आणण्याचे मोठे आव्हान आहे. घुगे यांच्या काळात माजलेला हा 'अवैध कचरा' दोशी कशा प्रकारे साफ करतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यातील अवैध धंदेवाल्यांचे कंबरडे मोडून काढण्यासाठी नव्या अधीक्षकांना 'सिंघम' अवतार धारण करावा लागणार आहे, हे मात्र निश्चित!



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.