Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"हा महाराष्ट्र आहे, इथे हे चालणार नाही"; सांगलीत धार्मिक भेदावरून लेन्सकार्ड व्यवस्थापनाची मनसेकडून कानउघडणी

"हा महाराष्ट्र आहे, इथे हे चालणार नाही"; सांगलीत धार्मिक भेदावरून लेन्सकार्ड व्यवस्थापनाची मनसेकडून कानउघडणी


सांगली: कामगारांच्या वैयक्तिक धार्मिक स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या व्यवस्थापनाला मनसेने 'सांगली स्टाईल'ने इशारा दिला आहे. पुष्पराज चौक येथील 'लेन्सकार्ड' या नामांकित कंपनीच्या शोरूममध्ये हिंदू कामगारांना टिळा लावण्यास आणि हातात धार्मिक धागा बांधण्यास मनाई केली जात असल्याचा प्रकार समोर आल्यानंतर, मनसे पदाधिकाऱ्यांनी थेट शोरूममध्ये धडक देऊन प्रशासनाला फैलावर घेतले.

​गेल्या काही दिवसांपासून या शोरूममध्ये कामगारांवर धार्मिक बंधने लादली जात असल्याच्या तक्रारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे प्राप्त झाल्या होत्या. विशेषतः हिंदू कर्मचाऱ्यांनी कपाळाला टिळा लावणे किंवा हातात दोरा बांधणे यावर व्यवस्थापनाने आक्षेप घेतल्याचे समजताच मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले. या पार्श्वभूमीवर मनसे जिल्हा उपाध्यक्ष श्रीधर (बटुदादा) करडे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी शोरूमला भेट दिली. यावेळी त्यांनी व्यवस्थापनाची कडक शब्दात कानउघडणी करत ठणकावून सांगितले की, "महाराष्ट्राच्या भूमीत कामगारांच्या श्रद्धेचा अपमान खपवून घेतला जाणार नाही. अशा प्रकारचा धार्मिक भेदभाव त्वरित थांबवावा." 

भविष्यात अशा तक्रारी पुन्हा आल्यास आंदोलनाचा मार्ग स्वीकारला जाईल आणि त्याला 'मनसे स्टाईल'ने चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असा सज्जड दमही यावेळी देण्यात आला. या आंदोलनात कुमार सावंत, रोहित घुबडे-पाटील, अमित पाटील, सुजित पवार, अमर औरादे आणि प्रकाश माळी यांसह अन्य मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मनसेच्या या आक्रमक पवित्र्यामुळे सांगलीतील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, आता संबंधित कंपनी आपल्या नियमावलीत काय बदल करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.