Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Big News! भोंदू खरातचा 'खासदार' डॉ. शेळके अपघातात ठार; आर्थिक गुपिते दफन?

Big News! भोंदू खरातचा 'खासदार' डॉ. शेळके अपघातात ठार; आर्थिक गुपिते दफन?


छत्रपती संभाजीनगर: वादाच्या भोवऱ्यात अडकलेला भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत वाढ झाली आहे. खरातचा सर्वात विश्वासू सहकारी आणि आर्थिक व्यवहारांतील मुख्य भागीदार डॉ. जितेंद्र शेळके यांचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात मृत्यू झाला. धोत्रे गावाजवळ संभाजीनगरहून शिर्डीच्या दिशेने जात असताना उभ्या कंटेनरला त्यांच्या कारने पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात शेळके यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी आणि मुलगा मृत्यूशी झुंज देत आहेत. 
मुख्य भागीदार डॉ. जितेंद्र शेळके भोंदू बाबा अशोक खरातला अटक झाल्यापासून प्रचंड मानसिक दडपणाखाली होते. खरातच्या ‘शिवनिका ट्रस्ट’चे उपाध्यक्ष म्हणून ते काम पाहत होते. खरातने हडपलेल्या जमिनी आणि कोट्यवधींच्या बेकायदेशीर आर्थिक व्यवहारांत शेळकेंचा सक्रिय सहभाग असल्याचा आरोप होता. त्यांची चौकशी करावी, अशी मागणी जोर धरत होती.
समृद्धी महामार्गावरील हा अपघात इतका भीषण होता की, कारचा पुढचा भाग अक्षरशः चिरडून कंटेनरमध्ये घुसला होता. दिवसाढवळ्या उभ्या असलेल्या कंटेनरला अशी जोरात धडक बसल्याने अनेकांना धक्का बसला आहे. खरातच्या अटकेनंतर या प्रकरणातील हा सर्वात मोठा ‘टर्निंग पॉईंट’ मानला जात असून, आता पोलीस डॉ. शेळकेंच्या कॉल रेकॉर्ड्सचीही पडताळणी करण्याची शक्यता आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.