Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कॅन्सर रुग्णांसाठी आनंदाची बातमी! फक्त ५ दिवसांत गाठींचा नायनाट करणारा औषधाचा डोस?

कॅन्सर रुग्णांसाठी आनंदाची बातमी! फक्त ५ दिवसांत गाठींचा नायनाट करणारा औषधाचा डोस?


आता 5 दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस आल्याचा दावा करण्यात आलाय. एका डोसमुळे कॅन्सर बरा होऊ शकतो असा दावा केल्याने आम्ही याची पडताळणी सुरू केली. मग काय सत्य समोर आलं चला पाहुयात... कॅन्सर आता एका डोसमध्ये बरा होऊ शकतो असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय. एकाच डोसने अवघ्या पाच दिवसांत गाठी पूर्णपणे नष्ट होतात असा दावा केलाय. ग्लायोब्लास्टोमाच्या उपचारात, म्हणजेच मेंदूच्या घातक ट्यूमर नष्ट होऊ शकतो असा दावा केलाय.'द न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन' मध्ये प्रकाशित झालेल्या एका रिसर्चमध्ये हा दावा केलाय. मेसेजमध्ये काय म्हटलंय पाहुयात...

ग्लिओब्लास्टोमा म्हणजे मेंदूच्या घातक ट्यूमरचा एक प्रकार आहे.यावर उपचार करण्यासाठी CAR-T सेल थेरपीने गाठ पूर्णपणे नष्ट करता येते असा मेसेज व्हायरल होत आहे. चाचणीदरम्यान उपचार घेतलेल्या पहिल्या तीन रुग्णांपैकी प्रत्येकाच्या ट्यूमरच्या आकारात झपाट्याने घट झाली असाही दावा केलाय. CAR-T थेरपी म्हणजे काय आणि ती कशी काम करते हे जाणून घेऊयात...

CAR-T थेरपी म्हणजे काय?

CAR-T थेरपी ही कॅन्सरच्या उपचारांसाठी महत्त्वाची

रुग्णाच्या स्वतःच्या रोगप्रतिकारक पेशींचा वापर करतात

रक्ताच्या कॅन्सरवरील उपचारासाठी CAR-T सेल थेरपी क्रांतिकारक

उपचारपद्धत रोगप्रतिकारक पेशींना कॅन्सरशी लढण्यास सक्षम करते

CAR-T थेरपी कशी कार्य करते?

रुग्णाच्या रक्तातून टी-पेशी काढल्या जातात

या पेशी प्रयोगशाळेत पाठवल्या जातात

विशिष्ट रिसेप्टर समाविष्ट करण्यासाठी जनुकीय बदल करतात

सक्रिय CAR-T पेशी रुग्णाच्या शरीरात परत सोडतात

पण, खरंच या दाव्यात तथ्य आहे का? याची सत्यता जाणून घेण्यासाठी आम्ही तज्ज्ञांकडून अधिक माहिती घेतली. त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात.

CAR-T थेरपीची ट्रिटमेंट आणि रिझल्ट सकारात्मक

आतापर्यंतचे ट्रायल फार चांगले आहेत

3 फेजमध्ये CAR-T थेरपीची ट्रायल होणार

पहिले ट्रायल सकारात्मक झाल्याने आशादायी

सध्या या CAR-T सेल थेरपीची चाचणी सुरू आहे. मात्र, ही थेरपीच्या माध्यमातून कॅन्सरची गाठ नष्ट होऊ शकते अशी माहिती तज्ज्ञांनी दिलीय. अजून उपचार सुरू झालेले नाहीत. भविष्यात मेंदूत होणाऱ्या कॅन्सरच्या गाठीसाठी हा उपचार होऊ शकतो. त्यामुळे आमच्या पडताळणीत हा दावा सत्य ठरलाय.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.