Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली :- शिराळ्यात एसीबीचा मोठा दणका! ३५ हजारांची लाच घेताना महिला सरपंच पतीसह ताब्यात

सांगली :- शिराळ्यात एसीबीचा मोठा दणका! ३५ हजारांची लाच घेताना महिला सरपंच पतीसह ताब्यात


पेव्हिंग ब्लॉक बसवण्याच्या कामाचे बिल काढण्यासाठी 35 हजाराची लाच घेताना वाकुर्डे खुर्द (ता. शिराळा) येथील महिला सरपंचासह शिक्षकाला अटक करण्यात आली. सोमवारी दुपारी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती सांगली लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पोलीस उपाधीक्षक यास्मिन इनामदार यांनी दिली.

सरपंच सौ. शितल बाळासाहेब पाटील (वय ४३, वाकुर्डे खुर्द ता. शिराळा), बाळासाहेब आकाराम पाटोल (वय ५३, पद शिक्षक प्राथमिक शाळा जाधववाडी, माधळगाव, केंद्र वाकूडे खुर्द ता. शिराळा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तक्रारदार यांना वाकुर्डे खुर्द येथील संत रोहिदास नगर वाकडे खुर्द येथे अनुसूचित जाती व जमाती नवबौद्ध घटकांचा विकास करणे या योजनेअंतर्गत पेव्हिंग ब्लॉक बसवणे कामाच्या देखरेख व प्रशासकीय कामकाजासाठी मक्तेदार यांचेकडून अधिकार पत्र देण्याल आले होते. 
सदर काम पूर्ण झाले असून सदर कामाचे अनुदानाचा पहिला हप्ता मक्तेदार यांना प्राप्त झाला असून उर्वरित हप्ता मिळणे करिता तक्रारदार यांना सदर काम ग्रामपंचायतीला हस्तांतरित केल्याची पावती आवश्यक होती. तसेच सदर कामाचे संदर्भातील विमा, उपकर, आयकर, टेंडर प्रमाणे, सीजीएसटी व एसजीएसटी अशा शासन कपाती शासनास जमा होणे आवश्यक होते.

सदर कामाचो ताबा पावती वर सरपंच व ग्रामसेवक यांची सही आवश्यक असून तक्रारदार यांना ती पावती देणे करिता तसेच सदर कामाची शासन कपाती शासनास जमा करणे करिता सरपंच शितल पाटील व त्यांचे पती बाळासाहेब पाटील यांनी सदर कामाचे एकूण मंजूर अनदान रकमेच्या ७टक्के रक्कम लाच मागितले बाबतचा तक्रार अर्ज तक्रारदार यांनी सांगली लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिला होता.

तक्रारदार यांच्या तक्रारीनुसार पडताळणी केल्यावर पाटील दाम्पत्याने 35 हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. सोमवारी दुपारी या दाम्पत्याला 35 हजारांची लाच घेताना रंगेहात पकडून अटक करण्यात आली. त्यांच्याविरोधात शिराळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सांगली एसीबीच्या पोलीस उपाधीक्षक यास्मिन इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक, किशोरकुमार खाडे, योगेश चव्हाण, प्रितम चौगुले, अजित पाटील, चंद्रकांत जाधव, पोपट पाटील, उमेश जाधव, सलीम मकानदार, ऋषिकेश बडणीकर, रामहरी वाघमोडे, धनंजय खाडे, सुदर्शन पाटील, सागर नायकूडे, राजेश मुदगल, महेश शेडगे, चालक विठ्ठलसिंग राजपूत यांच्या पथकाने ही कारवाई केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.