अण्णाभाऊ साठे दलित वस्ती निधीवर डल्ला? डॉ. महेश कुमार कांबळेंचा धमाका; महापालिकेसह प्रशासनाला न्यायालयाची नोटीस!
सांगली: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधार योजनेच्या कोट्यवधींच्या निधीत सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेत मोठा 'झोल' झाल्याचा खळबळजनक आरोप स्वाभिमानी आंबेडकरी चळवळीचे नेते डॉ. महेश कुमार कांबळे यांनी केला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत न्यायालयाने प्रशासनाला दणका दिला असून तत्कालीन जिल्हाधिकारी, प्रशासक आणि आयुक्तांना नोटीस बजावली आहे.
कोट्यवधींचा निधी गेला कुठे?
डॉ. कांबळे यांनी पुराव्यासह दावा केला आहे की:
माजी सभापती अनिता मोहन वानखेडे यांच्या काळात सुमारे ६० ते ६५ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला.
इतर कालावधीत २२ ते २५ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मिळाला.
एवढी प्रचंड रक्कम कागदोपत्री खर्च होऊनही दलित वस्त्यांची अवस्था 'जैसे थे'च आहे. "ज्या अण्णाभाऊंच्या नावाने हा निधी येतो, त्यांच्या स्मारकावर एक रुपयाही खर्च केला जात नाही, मात्र वस्त्यांच्या नावाखाली येणारा पैसा इतरत्र वळवून दलित-बहुजन समाजाची फसवणूक केली जात आहे," असा संताप डॉ. कांबळे यांनी व्यक्त केला.
न्यायालयाचा दणका: ४१ कामांना स्थगितीचे संकेत
९ एप्रिल २०२६ रोजी सांगली दिवाणी न्यायालयाने या प्रकरणातील गांभीर्य ओळखून १० कोटी २० लाख २७ हजार ९३९ रुपयांच्या एकूण ४१ कामांवर स्थगिती का देऊ नये? अशी विचारणा करत संबंधित बड्या अधिकाऱ्यांना नोटीस धाडली आहे. न्यायालयाच्या या पवित्र्यामुळे महापालिका वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
आता थेट हायकोर्टात जाणार!
डॉ. कांबळे यांनी याप्रकरणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचीही भेट घेऊन मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपाची मागणी केली आहे. "जर आठ दिवसांत या घोटाळ्याची निष्पक्ष चौकशी झाली नाही, तर हा लढा थेट उच्च न्यायालयात नेला जाईल," असा थेट इशारा त्यांनी दिला आहे.थोडक्यात महत्त्वाचे:आरोप: निधीचा मूळ उद्देशापासून विचलित वापर आणि गैरव्यवहार.रक्कम: सुमारे ८० ते ९० कोटींच्या निधीवर प्रश्नचिन्ह.न्यायालयीन कारवाई: ४१ विकासकामांवर टांगती तलवार.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.