खासदार विशाल पाटील यांच्या पुढाकारामुळे 'त्या' ८०० मीटरचा अडथळा दूर; सांगली-पेठ मार्गावरील रखडलेल्या कामाला अखेर सुरुवात
सांगली : सांगली-पेठ या अत्यंत महत्त्वाच्या महामार्गावरील कसबे डिग्रज ते तुंग दरम्यान रखडलेल्या ८०० मीटर रस्त्यासाठी वाहनधारकांना सोसाव्या लागणाऱ्या 'नरकयातना' अखेर संपणार आहेत. खासदार विशाल पाटील आणि जिल्हाधिकारी मैनाक घोष यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर, आज (ता. २२) या उर्वरित रस्त्याच्या कामाचा नारळ फुटला आहे.
नेमका वाद काय होता?
नागपूर-रत्नागिरी आणि पुणे-बंगळूर या दोन प्रमुख महामार्गांना जोडण्यासाठी 'NH-166H' हा सांगली-पेठ चारपदरी रस्ता तयार करण्यात आला आहे. मात्र, याच मार्गावर १६ पदरी रस्ता आणि टोलनाका उभारण्याचे नियोजन होते. टोलनाक्यासाठी जमीन देण्यास स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवल्याने, हा ८०० मीटरचा तुकडा अनेक महिन्यांपासून अर्धवट स्थितीत होता. यामुळे धुळीचा त्रास आणि खडतर प्रवासाचा सामना प्रवाशांना करावा लागत होता.
असा निघाला तोडगा
रस्त्याचा हा गंभीर प्रश्न मार्गी लावण्यासाठी जिल्हाधिकारी मैनाक घोष, खासदार विशाल पाटील, शेतकरी नेते रघुनाथ पाटील, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि महामार्ग प्राधिकरण यांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर शेतकऱ्यांनी कामाला सहमती दर्शवली आणि आज प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली.काँक्रिटीकरणाचे असे असतील 'थर'पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर असून, रस्त्याची मजबूती खालील तांत्रिक पद्धतीनुसार केली जाणार आहे:थर (Layers) जाडी (Thickness)मुरुम ५०० एमएम (गरजेनुसार अधिक)जीएसबी (Granular Sub-base) १५० एमएमडीएलसी (Dry Lean Concrete) १५० एमएमकाँक्रिट (PQC) ३०० एमएमपावसाळा सुरू होण्यापूर्वी हे काँक्रिटीकरण पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. खासदार विशाल पाटील यांनी या प्रश्नात स्वतः लक्ष घातल्याने अनेक महिन्यांचा हा वनवास संपणार असल्याने वाहनधारकांतून समाधान व्यक्त होत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.