Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"तुम्हे हराने के लिए..." : सहर शेख यांचा विरोधकांना थेट इशारा; सर्व आरोप फेटाळले!

"तुम्हे हराने के लिए..." : सहर शेख यांचा विरोधकांना थेट इशारा; सर्व आरोप फेटाळले!


ठाणे : ठाणे महापालिकेतील एमआयएमची युवा नगरसेविका सहर शेख हिचा जात दाखला बनावट असल्याच्या आरोपावर तिचे वडील युनूस शेख यांनी आपल्यावरील सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. राजकीय हेतूने ⁠आम्हाला टार्गेट केले गेले आहे. सगळे पुरावे दिल्यानंतर, आम्हाला तहसील अधिकाऱ्यांनी जातीचे प्रमाणपत्र दिले. तसेच जात पडताळणी अधिकाऱ्यांनीही देखील पुरावे पाहूनच आम्हाला प्रमाणपत्र दिले. पण आमची वाढती लोकप्रियतेमुळे काही जणांच्या पोटात दुखल्याने त्यांनी आमच्या दाखल्यावर आक्षेप घेतले. 

मात्र आम्ही घाबरून जाणारे नाही, आम्ही लढणारे आहोत, असे युनूस शेख यांनी सांगितले. दुसरीकडे 'अपनी काबिलियत इतनी बढाओ कि लोगो को तुम्हे हराने के लिए, कोशिशें नही साजिशें करनी पड़ें' अशा शायराना अंदाजात सहर शेख यांनी टीकाकारांना उत्तर दिले. 'फेक नरेटिव्ह'चा द एन्ड असे म्हणत बापलेकीने पत्रकार परिषद घेतली. ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत मुंब्र्यातील प्रभाग क्रमांक ३० मधून एमआयएमच्या तिकीटावर सहर शेख विजयी झाली आहेत. तिच्या वडिलांच्या जात प्रमाणपत्राबाबत तक्रार दाखल झाली असून नमुना-८ चा चुकीचा वापर केल्याचा आरोप आहे. याचसंदर्भात मुंब्र्यातील कार्यालयात बापलेकीने पत्रकार परिषद घेऊन आपल्यावरील आरोपांना उत्तरे दिली.



एकाच तहसीलदारांनी दोघांना प्रमाणपत्र दिले, मग माझे चूक कसे?
⁠माझे जात प्रमाणपत्र बनावट नाही. ⁠मला ठाणे तहसीलदारांनी प्रमाणपत्र दिले आहे. ⁠१५ वर्षापूर्वी मला प्रमाणपत्र दिले, ⁠जे ओरिजनल आहे. आम्हाला हे सर्टिफिकेट तहसीलदारांनी दिले. पण त्याचा उल्लेख केला गेला नाहीये. ⁠ते राजकीय दबावाखाली आहेत का? सुनावणी मनमानी पद्धतीने घेतली. ⁠मी सर्व पुरावे दिले तरी पण तहसीलदार उमेश पाटील यांनी ते ग्राह्य धरले गेले नाही. ⁠जो तक्रारारदार आहे त्याच्या प्रमाणपत्रावर आणि माझ्या प्रमाणपत्रावर एकाच अधिकाऱ्याची सही आहे, मग त्याचे प्रमाणपत्र बरोबर आणि माझे चूक असे कसे असू शकते? असा सवाल युनूस शेख यांनी विचारला.

आम्हाला बदनाम करण्यामागे राष्ट्रवादीची छुपी शक्ती


अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून तक्रारारदाराने निवडणूक लढवली होती. ⁠त्यांचा ठाण्यातील बॉस कोण आहे हे सगळ्यांना माहिती आहे. ⁠नजीब मुल्ला आणि एक ग्रुप माझ्या मुलीच्या मागे राजकीय षडयंत्र करीत आहेत. ⁠दोन छुप्या ताकद माझ्या मुलीच्या मागे लागल्या आहेत. ⁠त्यांना आम्हाला काम करू द्यायचे नाहीये. आमची वाढलेली पॉवर त्यांना बघवत नाहीये, असे युनूस शेख म्हणाले.

'तुम्हे हराने के लिए, कोशिशें नही साजिशें करनी पड़ें'
नगरसेविका सहर शेख यांचे नगरसेवक पद धोक्यात आल्यानंतर कागदपत्रांनिशी तिने आज पत्रकार परिषद घेतली. एमआयएमची ताकद वाढत असल्याने विरोधकांच्या पायाखालची जमीन घसरली असल्याचे सांगत शायराना अंदाजात तिने निशाणा साधला. 'अपनी काबिलियत इतनी बढाओ की लोगो को तुम्हे हराने के लिए, कोशिशें नही साजिशें करनी पड़ें' असे ती म्हणाली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.