Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अशोक खरात प्रकरण: व्हिडिओ पॉर्न साईटवर गेल्याने खळबळ; पीडितेच्या कुटुंबावर ओढवली 'वर्क फ्रॉम होम'ची वेळ!

अशोक खरात प्रकरण: व्हिडिओ पॉर्न साईटवर गेल्याने खळबळ; पीडितेच्या कुटुंबावर ओढवली 'वर्क फ्रॉम होम'ची वेळ!


महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदू बाबा अशोक खरात ऊर्फ कॅप्टन खरात याच्या कृत्यांनी महाराष्ट्र हादरला आहे. आता या प्रकरणाला एक गंभीर वळण मिळाले असून, खरातने शूट केलेले पीडित महिलांचे व्हिडिओ सोशल मीडियावर आणि चक्क अश्लील संकेतस्थळांवर व्हायरल झाले आहेत. यामुळे पीडित महिला आणि त्यांच्या कुटुंबासमोर मोठे संकट उभे ठाकले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे पीडित महिलांच्या नातेवाईकांना समाजात वावरणे कठीण झाले आहे. एका पीडित महिलेच्या भावाने आपली व्यथा मांडताना सांगितले की, बदनामीच्या भीतीने त्यांनी गेल्या सात दिवसांपासून ऑफिसला जाणे बंद केले आहे. परिस्थिती इतकी गंभीर आहे की, कार्यालयाकडे त्यांनी 'वर्क फ्रॉम होम'ची विनंती केली आहे. घराबाहेर पडल्यावर लोक ज्या नजरेने बघतात, त्याला सामोरे जाण्याची ताकद आता उरलेली नाही, असे त्यांनी हताशपणे सांगितले. आजतकने याची बातमी दिली आहे.
SIT कडून मोठी कारवाई

आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखालील एसआयटी या प्रकरणाचा कसून तपास करत आहे. तपासादरम्यान खरातच्या फार्महाऊस आणि बंगल्यातून १०० हून अधिक संशयास्पद व्हिडिओ क्लिप्स जप्त करण्यात आल्या आहेत. यातील अनेक क्लिप्स पॉर्न साइट्सवर अपलोड झाल्याचे समोर आले असून, पोलिसांनी आतापर्यंत १७० हून अधिक वेबसाइट्सवरून हा मजकूर हटवला आहे.

न्यायालयीन कोठडीत वाढ
अशोक खरातला १७ मार्च रोजी अटक करण्यात आली होती. न्यायालयाने त्याची पोलीस कोठडी १ एप्रिलपर्यंत वाढवली आहे. खरातला काही डॉक्टरांनी मदत केल्याचा संशय असून, महिलांना गुंगीचे औषध देणे किंवा बेकायदेशीर गर्भपात करणे यामध्ये कोणाकोणाचा हात आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, खरातची एचआयव्ही चाचणी करण्यात आली असून ती निगेटिव्ह आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेत दोषींवर कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.