२१ व्या शतकातही अघोरी प्रथा जिवंत! सुनेला विवस्त्र करून तंत्रमंत्राचा खेळ; सासऱ्याचे संतापजनक कृत्य.
संपत्ती आणि समृद्धीसाठी अंधश्रद्धा, मंत्रतंत्र आणि जादूटोण्याच्या अधीन झालेल्या एका कुटुंबाने नवविवाहित सुनेसोबत केलेल्या क्रौर्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कानपूरमधील या कुटुंबातील सासू-सासऱ्यांनी सुनेला विवस्त्र करून संपूर्ण कुटुंबासोबत पूजेला बसवले.
धक्कादायक बाब म्हणजे या महिलेच्या पतीने तिला साथ न देता कुटुंबीयांची बाजू घेतली. जेव्हा पीडित महिलेने या धक्कादायक प्रकाराला विरोध केला. तेव्हा तिला मारहाण करण्यात आली. तसेच माहेरहून कोट्यवधी रुपये आणि सोनंनाणं आणण्यासाठी दबाव आणला. त्याबरोबरत आपली वरपर्यंत ओळख असल्याचे सांगत तक्रार न देण्यासाठी तिला धमकावले. आता या प्रकरणी पीडित महिलेने पोलिसांमध्ये तक्रार दिली असून, या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिलेला विवाह दोन वर्षांपूर्वी कौतुक मिश्रा याच्यासोबत झाला होता. कौतुक मिश्रा याचे वडील विनित मिश्रा आणि आजोबा बब्बू मिश्रा हे कानपूरमधील प्रतिष्ठित सराफा व्यावसायिक आहेत. दरम्यान. लग्नावेळी या तरुणीच्या वहिलांना सासरच्या मंडळींना ५ कोटी रुपयांचा हुंडा दिला होता. मात्र लग्नानंतर या महिलेसोबत सासरी अत्यंत धक्कादायक घटना घडली. या संदर्भात दिलेल्या तक्रारीमध्ये महिलेने सांगितले की, लग्नानंतर सासरी गेल्यावर एकेदिवशी रात्री १२ वाजता सासूने मंत्र तंत्रासह पूजा सुरू केली. अशी पूजा केल्यानेच आमच्या घरात समृद्धी आली आहे, असे ती म्हणाली. तसेच मलाही त्या पूजेमध्ये सहभागी व्हावं लागेल, असे तिने मला सांगितले.
मात्र या पूजेसाठी घरातील सर्व जण विवस्त्र होऊन सहभागी होतात. त्यामुळे तुलाही आपले कपडे काढून या पूजेमध्ये सहभागी व्हावे लागेल, असेही सासूने मला सांगितले. मात्र मी याला विरोध केला. तेव्हा माझे पती आणि सासऱ्यांनी जबरदस्तीने माझे कपडे उतरवले. त्यानंतर माझ्या पतीने मला विवस्त्रावस्थेत एका खोलीत बंद केले. तिथे माझ्या सासऱ्यांनी सर्व मर्यादा पार करत माझ्या शरीराला राख फासली. त्यानंतर सर्वांसह मला विवस्त्रावस्थेत पूजेला बसवण्यात आले, असे पीडित महिलेले आपल्या तक्रारीत म्हटले आहे.यादरम्यान, मला मारहाण करण्यात आली. या धक्कादायक प्रकारातून मी सावरू शकले नाही. अशा पूजेसाठी मला जबरदस्तीने बसवण्यात आल्याचे मी माझ्या आईला सांगितले. त्यानंतर माझ्या भावाने मला माहेरी बोलावून घेतले. त्यानंतर सासरच्या लोकांनी दोन कोटी रुपये आणि १ किलो सोनं देण्यासाठी आमच्यावर दबाव आणला. माझ्या वडिलांनी लग्नावेळी आधीच ५ कोटी रुपये खर्च केले होते. तसेच त्यासाठी कर्जही घेतले होते. त्यानंतर सासरच्यांनी माझा शारीरिक आणि मानसिक छळही केला, असे पीडित महिलेने सांगितले. यानंतर माझ्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दिली. तेव्हा पोलिसांनी या कुटुंबाची प्रतिष्ठा आणि वरपर्यंत असलेल्या ओळखीचा हवाला देऊन तडजोड करण्याचा प्रयत्न केला. मात्र अखेरपर्यंत तडजोड न झाल्याने पोलिसांनी सदर कुटुंबातील सदस्यांवर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.