Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

करिअरमध्ये हवी आहे प्रगती? ऑफिस डेस्कवर ठेवा 'ही' खास मूर्ती!

करिअरमध्ये हवी आहे प्रगती? ऑफिस डेस्कवर ठेवा 'ही' खास मूर्ती!


वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरात किंवा ऑफिसमध्ये ज्या काही वस्तू असतात, त्याचा सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव तुमच्यावर पडत असतो. प्रत्येकाच्या घरात अशा काही गोष्टी असतात, ज्या नकारात्मक ऊर्जा तयार करत असतात. ही गोष्ट आपल्या लक्षात येत नाही. मात्र त्याचा परिणाम आपल्यावर होत असतो. जर घरात नकारात्मक ऊर्जा तयार झाली तर आयुष्यात वेगवेगळ्या समस्या येऊ शकतात. जसं की आर्थिक नुकसान होतं, काही कारण नसताना भांडणं होतात, यामुळे आपलं घर अस्थिर बनतं. अशावेळी ऊर्जा संतुलनाची गरज असते. वास्तुशास्त्रानुसार असे काही फोटो किंवा मूर्ती असतात जे ऊर्जा संतुलनाचं काम करतात. यामुळे आपल्यावर जी संकट येणार असतात, ती दूर होतात. एवढंच नाही तर आपल्याला आपल्या कामामध्ये यश मिळून प्रगतीला सुरुवात होते.
अनेक लोकांना ऑफीसमध्ये सर्व काही सुरळीत सुरू असताना अचानक काही अडचणी येण्यास सुरुवात होते. ऑफीसमध्ये मन लागत नाही, त्याचा परिणाम हा तुमच्या कामावर होतो. काम वेळेवर पूर्ण होत नाहीत, ज्याचा परिणाम हा तुमच्या प्रमोशनवर देखील होऊ शकतो. अनेकांच्या बाबतीमध्ये तर असं होतं की ऑफीसमध्ये ते सारखी चिडचिड करतात. हे कशामुळे होतं याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? तर तुमच्या भोवती जी नकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे, त्याचा हा परिणाम असतो. जेव्हा तुमच्या भोवती नकारात्मक ऊर्जा असते, तेव्हा त्याचा मोठा परिणाम तुमच्यावर होतं असतो. ही नकारात्मक ऊर्जा कमी करून ऊर्जा संतुलन साधण्यासाठी वास्तुशास्त्रात एक सोपा उपाय सांगण्यात आला आहे, त्याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

ऑफीसच्या डेस्कवर ठेवा ही मूर्ती

वास्तुशास्त्रानुसार जर तुमचं ऑफीसमध्ये मन लागत नसेल. कामं वेळेत पूर्ण होत नसतील, तुम्हाला प्रमोशन हवे असेल तर तुम्ही तुमच्या ऑफिसच्या डेस्कवर धावत्या घोड्याची मूर्ती ठेवू शकता. ही मूर्ती चांदीच्या धातुची असेल तर अधिकच उत्तम. धावत्या घोड्यांना प्रगती आणि गतीचं प्रतिक मानलं जातं. यामुळे ऊर्जा संतुलन साधलं जातं आणि तुमच्या प्रगतीला सुरुवात होते.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल सांगली दर्पण कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.