सांगली: सत्यशोधक पत्रकारितेतून समाजाला स्वातंत्र्य, समता ,बंधुता, न्याय आणि विज्ञानवादी दृष्टिकोन प्राप्त करून दिल्यानेच आजची बहुजन समाजाची सत्यशोधकी पत्रकारिता जोम धरू लागली आहे याचे सारे श्रेय महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सत्यशोधकी पत्रकारितेला त्यावे लागेल असे प्रतिपादन प्रा. दिलीप जाधव यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या बळवंत कॉलेज, विटा येथे महात्मा फुले जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 'सत्यशोधक पत्रकारितेचे आद्य जनक महात्मा फुले , या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून बोलत होतो अध्यक्ष स्थानी प्राचार्य डॉ.चंद्रकांत बोबडे अंतर्गत गुणवत्ता कक्ष, विवेक वाहिनी व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रा. जाधव म्हणाले की महात्मा फुले यांच्या सत्यशोधकी पत्रकारितेचा संघर्ष हा ब्राह्मण ब्राह्मणेतर होता. त्याचबरोबर धर्मशास्त्राने शतकानुशतके चालू असलेल्या बहुजन समाजाच्या शोषणाचा अंत करणारा होता. महात्मा फुले यांनी वैज्ञानिक मूल्यांचा प्रारंभ केला होता नवा विचार दिला सत्यशोधकी पत्रकारिता म्हणजे केवळ घटकावर मनोरंजन करण्यासाठी नव्हती तर ती सामाजिक वास्तवाचे भान ठेवून मानवी हक्कांची मागणी करणारी वास्तववादी चळवळ होती. 'सत्सार' मधून स्त्री, शुद्रातिशुद्र ,राष्ट्र उन्नतीचा विचार त्यांनी मांडला .प्रा .जाधव यांनी महात्मा फुले यांचा जीवन कार्याचा व वैचारिक भूमिकेचा आढावा आपल्या व्याख्यानात घेतला.
अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ चंद्रकांत बोबडे यांनी महात्मा फुले यांच्या विचारधारेवरच रयत शिक्षण संस्थेची उभारणी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केली आहे. आपण त्यांच्या विचारांचे पाईक असून महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करणे ही काळाची गरज असल्याचे म्हणाले. प्रारंभी व्यासपीठावरील महात्मा ज्योतिराव फुले कर्मवीर भाऊराव पाटील सौ लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रमुख व्याख्याते प्राध्यापक दिलीप जाधव यांचा प्राचार्य डॉ.बोबडे यांनी सत्कार केला. मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
विवेक वाहिनीचे चेअरमन प्राध. डॉ.सिद्राम खोत यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व व्याख्याते यांचा परिचय करून दिला या कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ.राजकुमार मोरे उपप्राचार्य डॉ.श्रीमती राणी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक प्रा .राहुल पाटील ज्युनिअर कॉलेजचे विभाग प्रमुख प्रा.ए. पी.साळुंखे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका रंजना बागल यांनी केले तर आभार प्रा .डॉ. प्रवीण बाबर यांनी मानले. कार्यक्रमास विविध विभागातील विभाग प्रमुख व प्राध्यापक शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.