काळजाचा थरकाप! मुंबईतील 'त्या' घटनेनंतर आता नाशिक हादरले; साबण खाल्ल्याने २० वर्षीय तरुणाचा करुण अंत
नाशिक: एकीकडे दोन दिवसांपूर्वी मुंबईतील पायधुनी येथे कलिंगड खाल्ल्याने एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, आता नाशिकमधून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी बातमी समोर आली आहे. अंघोळीचा साबण खाल्ल्याने एका २० वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागला असून, या घटनेने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
नाशिकमधील अथर्व द्विवेदी या २० वर्षीय तरुणाने राहत्या घरी अंघोळीचा साबण खाल्ला. साबण पोटात गेल्यामुळे काही वेळातच अथर्वची प्रकृती खालावली आणि त्याला असह्य त्रास होऊ लागला. ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, काळाला काही वेगळेच मान्य होते. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही अथर्वचा जीव वाचवता आला नाही आणि तपासणीनंतर त्याला 'मृत' घोषित करण्यात आले.
चूक की अगतिकता? 'स्पेशल चाइल्ड' असल्याने ओढवला अनर्थ
मिळालेल्या माहितीनुसार, मृत अथर्व हा 'स्पेशल चाइल्ड' (विशेष मुलगा) होता. त्याला काय खावे आणि काय खाऊ नये, याची पुरेशी समज नव्हती. याच अगतिकतेपोटी त्याने खेळता-खेळता किंवा चुकून साबण खाल्ला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. एका क्षणाची चूक या कुटुंबासाठी कायमची जखम देऊन गेली आहे.
"डॉक्टरांनाही बसला धक्का"
जेव्हा अथर्वला रुग्णालयात आणले गेले, तेव्हा त्याची अवस्था पाहून डॉक्टरही सुन्न झाले. साबणासारखी वस्तू शरीरात गेल्याने झालेल्या रिअॅक्शनमुळे त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. द्विवेदी कुटुंबावर दुःखाचा डोंगर, पोलिसांत नोंद ज्या मुलाला काळजाच्या तुकड्याप्रमाणे जपले, त्याच मुलाचा अशा विचित्र पद्धतीने अंत झाल्याने द्विवेदी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे नाशिकमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.याप्रकरणी नाशिकच्या इंदिरा नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास: पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. अहवालानंतर मृत्यूचे नेमके तांत्रिक कारण स्पष्ट होईल.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.