Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पृथ्वीराजबाबा पाटील यांच्यावर‘कोल्हापूर पश्चिम’ची जबाबदारी प्रभारीपदी नेमणूक ः प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची नवी टीम

पृथ्वीराजबाबा पाटील यांच्यावर ‘कोल्हापूर पश्चिम’ची जबाबदारी प्रभारीपदी नेमणूक ः प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची नवी टीम


सांगली :- भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी राज्यभर नवीन टीम बांधायला सुरवात केली असून नवीन प्रभारींची नेमणूक केली जात आहे. त्यात कोल्हापूर पश्चिमची जबाबदारी सांगलीचे भाजप नेते पृथ्वीराज पाटील यांच्यावर सोपवण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघ, पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्री. पाटील यांच्याकडे अत्यंत महत्वाच्या विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

सांगली जिल्ह्यातून आमदार गोपीचंद पडळकर यांची सोलापूर पूर्व तर भाजपा नेते शेखर इनामदार यांची पुणे शहर प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पृथ्वीराज पाटील यांचे संघटनात्मक बांधणी कौशल्य सातत्याने प्रभावी राहिले आहे. याआधी काँग्रेसमध्ये असताना सांगली शहर जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी केलेली बांधणी, नव्या कार्यकर्त्यांना दिलेली संधी यामुळे त्या पदाला ग्लॅमर प्राप्त झाले होते. 

 
भाजपमध्ये त्यांच्या प्रवेशावेळी मान्यवर नेत्यांनी त्यांच्या संघटक कौशल्याचे भरभरून कौतुक केले होते. आता मोठ्या व्यासपीठावर त्यांना हेच कौशल्य सिद्ध करण्यासाठी संधी मिळाली आहे. कोल्हापूर हा पश्चिम महाराष्ट्रातील भाजपचे विशेष लक्ष असलेला जिल्हा आहे. कोल्हापूर पश्चिमचे राजकारण नेहमीच गरम राहिलेले आहे. या स्थितीत पक्षाला बळ देणे, संघटनात्मक बांधणीतून पक्ष विस्तार करणे, याकामी पृथ्वीराज पाटील यांच्या अनुभवाचा निश्चित फायदा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास मी सार्थ ठरवीन, असा विश्वास पृथ्वीराज पाटील यांनी यानिमित्ताने व्यक्त केला आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.