बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. इंडियन बँकेने स्पेशालिस्ट ऑफिसर (सहाय्यक व्यवस्थापक पदासह) पदांसाठी भरती जाहीर केली आहे.
या भरतीसाठी ८ एप्रिलपासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. इच्छुक तरुणांनी indianbank.bank.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचे आहे. Indian Bank Bharti 2026
या भरतीद्वारे एकूण ३५० जागा भरल्या जाणार आहेत. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ एप्रिल २०२६ निश्चित करण्यात आली आहे. या नोकरीसाठी तुम्ही १३ मेपर्यंत अर्जाची प्रिंट काढू शकतात.
भरती पात्रता
अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स/इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी/ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन्स/इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये पदवी प्राप्त केलेली असावी. या नोकरीसाठी २२ ते ४५ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. वेगवेगळ्या पदांसाठी वयोमर्यादा वेगवेगळी आहे.
परीक्षा शुल्क :
अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि दिव्यांग (PwD) उमेदवारांसाठी शुल्क ₹175 (केवळ माहिती शुल्क) आहे, तर सर्वसाधारण, इतर मागास वर्ग (OBC) आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) प्रवर्गांसाठी अर्ज शुल्क ₹1000 आहे.
किती पगार मिळेल?
वेतनश्रेणी I (सहाय्यक व्यवस्थापक): ₹४८,४८० ते ₹८५,९२०वेतनश्रेणी II (व्यवस्थापक): ₹६४,८२० ते ₹९३,९६०वेतनश्रेणी III (वरिष्ठ व्यवस्थापक): ₹८५,९२० ते ₹१,०५,२८०निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या पगाराव्यतिरिक्त इतर भत्ते मिळतील, ज्यामुळे एकूण पगार आणखी आकर्षक होईल.
अर्ज कसा करावा
सर्वप्रथम, उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
त्यानंतर, त्यांनी होमपेजवरील संबंधित लिंकवर क्लिक करावे.
यानंतर, उमेदवारांनी स्वतःची नोंदणी करावी.
नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर, उमेदवारांनी आपला अर्ज भरावा.
अर्ज पूर्ण झाल्यावर, उमेदवारांनी तो सबमिट करावा.
अर्ज सबमिट केल्यानंतर, उमेदवारांनी कन्फर्मेशन पेज डाउनलोड करावे.
शेवटी, उमेदवारांनी त्याची प्रिंटआउट घ्यावी.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.