Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

निवासी डॉक्टरांची आक्रमक भूमिका; महागाई भत्ता न मिळाल्यास काम बंद करण्याचा इशारा.

निवासी डॉक्टरांची आक्रमक भूमिका; महागाई भत्ता न मिळाल्यास काम बंद करण्याचा इशारा.


मुंबई : निवासी डॉक्टरांना राज्य सरकारकडून लागू केलेली महागाई भत्त्यातील वाढ मुंबई महानगरपालिकेकडून केईएम, नायर, शीव आणि कूपर रुग्णालयांमधील निवासी डॉक्टरांना तब्बल २१ महिने ओलांडली तरी लागू करण्यात आली नाही. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टर व राज्य सरकारच्या महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांच्या महाभाई भत्त्यामध्ये ३१ टक्के इतका फरक आहे. परिणाम मुंबई महानगरपालिकेतील निवासी डॉक्टरांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे तातडीने महागाई भत्त्यातील वाढ लागू न केल्यास शुक्रवारपासून टप्प्याटप्प्याने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा बीएमसी मार्डने दिला आहे.

राज्य सरकारने १ जुलै २०२४, १ जानेवारी २०२५ आणि १ जुलै २०२५ रोजी निवासी डॉक्टरांना मिळणाऱ्या महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार राज्य सरकार अंतर्गत असलेल्या सर्व वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांना ही वाढ लागू करण्यात आली आहे. मात्र मुंबई महानगरपालिकेच्या केईएम, नायर, शीव आणि कूपर रुग्णालयातील निवासी डॉक्टरांना अद्यापपर्यंत ही वाढ लागू करण्यात आलेली नाही. त्यामुळे राज्य सरकारच्या वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांना मिळणारा महागाई भत्त्याचा दर हा ४७४ टक्के इतका आहे, तर मुंबई महानगरपालिकेच्या केईएम, नायर, शीव आणि कूपर रुग्णालयांमध्ये कार्यरत निवासी डॉक्टरांना मिळणारा महागाई भत्त्याचा दर हा ४४३ टक्के इतका आहे. हा फरक ३१ टक्के इतका आहे.
परिणामी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. जुलै २०२५ पासून बीएमसी मार्डकडून महागाई भत्त्यात वाढ करण्याबरोबच भत्त्याची २१ महिन्यांची थकबाकी मिळावी यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. अनेक पत्रव्यवहार, बैठका आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करूनही यावर कोणताही तोडगा काढण्यात येत नाही. निवासी डॉक्टर हे मुंबईच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा कणा असून, ते सर्व दिवस, २४ तास सेवा देतात. अशा परिस्थितीत, योग्य आर्थिक हक्काची अंमलबजावणी न होणे ही बाब गंभीर असून, त्यामुळे निवासी डॉक्टरांमध्ये नाराजी आणि असंतोष वाढत आहे. त्यामुळे महागाई भत्ता वाढ व थकबाकी मिळण्याबाबत गुरुवारपर्यंत अधिकृत परिपत्रक महानगरपालिकेकडून जारी करण्यात आले नाही, तर शुक्रवारपासून टप्प्याटप्प्याने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा बीएमसी मार्डने दिला आहे.

प्रशासन आणि डॉक्टरांची बैठक
बीएमसी मार्डकडून यासंदर्भात ६ एप्रिल २०२६ रोजी आयुक्त, उपआयुक्त, अतिरिक्त आयुक्त, संचालक तसेच सर्व प्रमुख रुग्णालयांच्या अधिष्ठात्यांना सादर केले. यावेळी बीएमसी मार्डचे अध्यक्ष डॉ. चिन्मय केळकर, उपाध्यक्ष डॉ. दिग्विजय जाधव, सचिव डॉ. अमर आगमे, डॉ. कौस्तुभ कोकिल तसेच केईएम मार्डचे अध्यक्ष डॉ. शुभम सोलंके उपस्थित होते. यावेळी महागाई भत्ता वाढ यावर सविस्तर चर्चा करण्यात आली असता उपायुक्तांनी ९ एप्रिल रोजी दुपारी पुन्हा बैठक बोलवलेली आहे. तसेच उपमहापौर संजय घाडी यांचीही भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.