बीडमध्ये पुन्हा भीषण अपघात झाला आहे. लातूर-अंबाजोगाई महामार्गावरच्या नेहरूनगर कॉर्नरवर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात बीडच्या केज येथे कार्यरत असलेले तहसीलदाराचा जागीच मृत्यू झाला आहे. तहसीलदाराच्या मृत्यूने प्रशासकीय कर्मचाऱ्यांवर शोककळा पसरली आहे.
बीडमधील केज तालुक्याचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा आज बुधवारी सकाळी लातूर-अंबाजोगाई महामार्गावरील रेणापूर फाट्याजवळ भीषण कार अपघातात झाला. या कार अपघातात गिड्डे यांचा मृत्यू झालाय. राकेश गिड्डे हे स्वतःच्या कारने प्रवास करत होते, त्यावेळी त्यांच्या वाहनाचा अपघात झाला.प्राथमिक माहितीनुसार, ते कारमध्ये एकटेच होते. अचानक वेग वाढल्याने नियंत्रण गमावून त्यांची कार उलटली, असा अंदाज रेणापूर पोलिसांनी वर्तवला आहे. या अपघाताची तीव्रता इतकी होती की, या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने धाव घेतली.पोलिसांनी त्यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी रेणापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. एक कार्यक्षम आणि तरुण अधिकाऱ्याच्या अशा अचानक जाण्याने महसूल प्रशासनासह संपूर्ण केज तालुक्यावर मोठी शोककळा पसरली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.
तत्पूर्वी, बीडच्या अंबाजोगाई शहरातील रिंग रोडवर बुधवारी भीषण अपघात झाला. या अपघातात बँक अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. काल बँक अधिकारी आणि आज तहसीलदाराचा अपघाती मृत्यू झाल्याने बीडमधील रस्ते वाहतुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.