Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नारायण साईचा अखेर घटस्फोट; १८ वर्षांचे नाते संपुष्टात, पत्नीला मिळणार २ कोटींची पोटगी

नारायण साईचा अखेर घटस्फोट; १८ वर्षांचे नाते संपुष्टात, पत्नीला मिळणार २ कोटींची पोटगी


अनेक गंभीर आरोपांखाली तुरुंगात असलेला आसाराम बापू याचा मुलगा नारायण साई याचा घटस्फोट झाला आहे. इंदूरमधील कौटुंबिक न्यायालयाने नारायण साई आणि जानकी देवी यांचा घटस्फोट मंजूर केला आहे.


तसेच पत्नीला तीन महिन्यांच्या आत दोन कोटी रुपये द्यावेत, असे आदेश कोर्टाने नारायण साईला दिले आहेत. याबाबत जानकी देवीच्या वकिलांनी सांगितले की, नारायण साईकडून घटस्फोट घेण्यासाठी जानकी देवीने २०१८ साली अर्ज दाखल केला होता. तेव्हा कोर्टाने तिला दरमहा ५० हजार रुपये द्यावेत, असे आदेश नारायण साई याला दिले होते. मात्र गेल्या आठ वर्षांमध्ये नारायण साईने जानकी देवी हिला एक पैसाही दिला नाही, असा दावा जानकी देवीच्या वकिलांनी केला आहे.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार २०१८ साली जानकी देवी हरपालानी हिने नारायण साईविरोधात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. तेव्हा कोर्टाने प्राथमिक सुनावणी घेत जानकी हिला दरमहा ५० हजार रुपये उदरनिर्वाहासाठी देण्याचे आदेश नारायण साई याला दिले होते. जोपर्यंत कोर्टात खटला सुरू राहील तोपर्यंत पत्नीला आर्थिक मदत मिळावी, या उद्देशाने हे आदेश देण्यात आले होते. मात्र कोर्टाचा आदेश असतानाही नारायण साई याने मागच्या आठ वर्षांत एक रुपयाही पत्नीला दिला नव्हता.

दरम्यान, जानकी हरपालानी हिने नारायण साईविरोधात मानसिक छळासह अनेक आरोप याचिकेमधून केले होते. तसेच ५ कोटी रुपयांची एकरकमी एलिमनी देण्याची मागणी केली होती. तिने आपले आरोप सिद्ध करण्यासाठी काही पुरावेही दिले होते. तर नारायण साई याने हे आरोप फेटाळून लावले होते. मात्र सर्व युक्तिवादांची पडताळणी केल्यानंतर कोर्टाने जानकी हरपालानी हिची बाजू अधिक योग्य असल्याचे निरीक्षण नोंदवत तिच्याबाजूने निकाल दिला.

अखेरीस आठ वर्षे चाललेल्या कायदेशीर लढाईनंतर इंदूरमधील कौटुंबिक न्यायालयाने २ एप्रिल २०२६ रोजी या प्रकरणी निकाल सुनावला. तसेच दोघांच्याही घटस्फोटाला मंजुरी दिली. तसेच तीन महिन्याच्या आत जानकी देवी हिला २ कोटी रुपयांची एकरकमी पोटगी द्यावी असे आदेश नारायण साई याला दिले.

आसाराम बापूचा मुलगा नारायण साई हा बलात्कार प्रकरणात दोषी ठरल्यानंतर सध्या जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. तसेच तो गुजरातमधील सूरत येथील तुरुंगात बंद आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.