सांगली :- डिजिटल जनगणनेसाठी सज्ज व्हा! उपायुक्त अश्विनी पाटील यांच्या हस्ते सांगलीत प्रशिक्षणाचे उद्घाटन
देशातील पहिल्या ‘डिजिटल जनगणने’साठी सांगली महापालिका सज्ज; फील्ड ट्रेनर्सचे प्रशिक्षण पूर्ण मोबाईल ॲप आणि पोर्टलद्वारे होणार माहिती संकलन; उपायुक्त अश्विनी पाटील यांच्या हस्ते प्रशिक्षणाचे उद्घाट देशातील १६ व्या आणि स्वातंत्र्यानंतरच्या ८ व्या जनगणनेची प्रक्रिया आता खऱ्या अर्थाने वेग घेऊ लागली आहे. 'जनगणना २०२७' च्या पूर्वतयारीचा भाग म्हणून सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीने फील्ड ट्रेनर्ससाठी आयोजित करण्यात आलेले तीन दिवसीय विशेष प्रशिक्षण शिबिर मंगलधाम, सांगली येथे उत्साहात संपन्न झाले. या प्रशिक्षण सत्राचे उद्घाटन शहर जनगणना अधिकारी तथा उपायुक्त अश्विनी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मास्टर ट्रेनर म्हणून राजवर्धन पाटील व डॉ. रवींद्र ताटे यांनी उपस्थितांना तांत्रिक मार्गदर्शन केले.यंदाची जनगणना
जनगणना २०२७ ही दोन टप्प्यांत पार पडणार आहे. पहिला टप्पा ‘घरयादी व घरगणना’ असून दुसरा टप्पा ‘लोकसंख्या गणना’ हा असेल.१. १ मे ते १५ मे २०२६: नागरिकांना ‘स्वगणनेची’ (Self-Enumeration) ऑनलाइन सुविधा उपलब्ध असेल.२. १६ मे ते १४ जून २०२६:प्रगणक प्रत्यक्ष घरोघरी जाऊन माहिती संकलित करतील.यावेळी बोलताना उपायुक्त अश्विनी पाटील म्हणाल्या की, "यंदा प्रथमच मोबाईल ॲपच्या माध्यमातून डिजिटल पद्धतीने माहिती संकलित केली जाणार असून, डिजिटल माध्यमामुळे ही प्रक्रिया अधिक अचूक, जलद आणि पारदर्शक होईल. प्रगणक म्हणून शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून, फील्ड ट्रेनर्सच्या माध्यमातून त्यांना तांत्रिकदृष्ट्या सक्षम केले जात आहे."या सत्राला समाजविकास अधिकारी नितीन माळी, अधीक्षक राजेंद्र आवळे यांच्यासह महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या प्रशिक्षणामुळे आगामी जनगणनेचे राष्ट्रीय कार्य शहरात अधिक प्रभावीपणे पार पडेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.